Royal Enfield Super Meteor 650 Leaked Photo : रॉयल एनफील्ड सुपर मीटियोर 650 चा एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे. काही रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की, लीक झालेले फोटो रॉयल एनफील्ड सुपर मीटियोर 650 चे आहेत. फोटोमध्ये नव्या रॉयल एनफिल्डची डिझाइन आणि त्याचे काही फिचर्स दिसून येत आहेत. दरम्यान, आम्ही फोटो दाखवत नसलो तरी या बातमीत तुम्हाला रॉयल एनफिल्डच्या नव्या मॉडलबाबत मोठ्या अपडेट्स देत आहोत. यामध्ये डिझाइन, फिचर्स, लॉन्च, इंजिन आणि किंमतची माहिती देण्यात येणार आहे.
Royal Enfield Super Meteor 650 Design
रॉयल एनफील्ड सुपर मीटियोर 650 चं डिझाइन फारसं बदललेलं नाही. ही जुन्या मॉडेलच्या डिझाइनप्रमाणेच दिसून येत आहे. दरम्यान, काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे आधीच्या मॉडेलपेक्षा Royal Enfield Super Meteor 650 आणखी आकर्षक दिसून येते. या मॉडेलमध्ये विंडस्क्रीन, अपराइट हँडलबार पॉझिशनिंग, मोठी सीट आणि साईड माउंटेड एक्जॉस्ट असेल. याव्यतिरिक्त सर्क्युलर मिररही देण्यात आला आहे.
Royal Enfield Super Meteor 650 Feature
रॉयल एनफील्ड सुपर मीटियोर 650 मध्ये सुरक्षाविषयक फिचर्सचीही काळजी घेण्यात आली आहे. पुढे आणि मागे डोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ज्यांना ड्युअल एबीएस चॅनलनं जोण्यात आलं आहे. बाईकमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन असणारं सेमी डिजिटल इंस्ट्रमेंट कलस्टर आहे. दरम्यान, आतापर्यंत कोणतंही फिचर कंपनीकडून कन्फर्म करण्यात आलेलं नाही. आम्ही सांगत असलेले सर्व फिचर्स लीक फोटोमध्ये दिसत आहे.
Royal Enfield Super Meteor 650 Engine
रॉयल एनफील्ड सुपर मीटियोर 650 मध्ये 648cc चं ट्वीन सिलेंडर इंजिन दिलं जाऊ शकतं. ज्यांच्याकडे 47 पीएस पॉवर आणि 52 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन 6 स्पीड ट्रासमिशनसह कनेक्टेड केलं जाऊ शकतं.
Royal Enfield Super Meteor 650 Price & Launch
रॉयल एनफील्ड सुपर मीटियोर 650 च्या किमतीबाबत कंपनीनं आतापर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, याची किंमत कंपनीच्या इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टीनेंटल जीटी 650 च्या किमतीच्या जवळपास किंवा त्याहून अधिक असू शकते. कंपनी आपलं नवं मॉडलं पुढच्या वर्षी लॉन्च करु शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- भारतात सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले विकासासाठी 76 हजार कोटींच्या योजनेला मंजुरी
- भारतात लवकरच सुरू होणार हायड्रोजनवर चालणारी बस? केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडची चाचणी यशस्वी
- MG Motor कडून टोकियो पॅरालिम्पिक्स विजेत्या Bhavina Patel यांना 'हेक्टर' भेट
Car loan Information:
Calculate Car Loan EMI