Royal Enfield Hunter 350 Launch Date : प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी रॉयस एनफिल्ड (Royal Enfield) 5 ऑगस्टला आपली नवीन बुलेट Royal Enfield Hunter 350 चा फर्स्ट लूक दाखवेल. तर, 7 ऑगस्टला ही बुलेट भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे.  क्लासिक 350 आणि Meteor 350 वर वापरलेले इंजिन सारखेच असले तरी, ब्रँडने रायडर्सच्या नवीन विभागाला लक्ष्य करून डिझाईनच्या दृष्टीने काही बदल केले आहेत. रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 14.87kW म्हणजेच 20.2 hp चे पॉवर आउटपुट असेल. हंटर 350 चा व्हीलबेस 1,370 मिमी आणि लांबी 2055 मिमी देण्यात आली आहे. आणखी काय नवीन फिचर्स आहेत ते जाणून घेऊयात. 


Royal Enfield Hunter 350 फिचर्स : 


Royal Enfield Hunter 350 च्या कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास एनफील्ड हंटर ड्युअलटोन आणि सिंगल टोन कलर्ससह येईल. यामध्ये एकूण 8 प्रकार येतील. काही कलर त्यांच्या अॅपद्वारे विशिष्ट आहेत तर टॉप-एंड व्हेरियंटला ड्युअल-टोन कलर मिळतील. बाईकवरील लहान आणि उंचावलेला सायलेन्सर आणि मागील चाकाचा उंचावलेला मडगार्ड देखील याला रोडस्टर लूक देतो. डिझाईननुसार पाहिल्यास, हंटर क्लासिक आणि Meteor या दोन्हीपेक्षा लांबी आणि उंचीने लहान असणार आहे. 


किंमत किती?


Royal Enfield Hunter 350 ची सुरुवातीची किंमत 1.5 लाख रूपये असण्याची शक्यता आहे. Royal Enfield Hunter 350 Honda CB350 RS आणि Yezdi Scrambler या बाईकशी स्पर्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


महत्वाच्या बातम्या : 



 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI