River Indie launched: देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. हेच पाहता अनेक नवीन कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. आधी बाजारात फक्त काही निवडक ब्रॅन्डचेच इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होते. मात्र मागील दोन वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटरचे अनेक नवीन पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. यातच आज बेंगळुरूच्या इलेक्ट्रिक स्टार्ट-अप कंपनी रिव्हरने आपली नवीन 'इंडी ई-स्कूटर' इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. कंपनीच्या मते ही देशातील पहिली SUV स्कूटर आहे. याबद्दल सावितर माहिती जाणून घेऊ...
River Indie launched: जबरदस्त स्पेस
कंपनीच्या दाव्यानुसार, इंडी ई-स्कूटर 43-लिटर बूट स्पेस आणि 12-लीटर ग्लोव्ह बॉक्स स्पेससह एकूण 55-लिटर जागा देते.
River Indie launched: पॉवर पॅक
रिव्हरने या इंडी ई-स्कूटरमध्ये 4 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह 6.7 kW पॉवरची इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 5 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकतो.
River Indie launched: पॉवर रेंज
ही इलेक्ट्रिक स्कूटर 120 किमी पर्यंत (इको मोडवर) पूर्ण चार्ज राइडिंग रेंज देण्यास सक्षम आहे आणि तिचा टॉप स्पीड 90 किमी/तास आहे. इंडी ई-स्कूटर तीन राइडिंग मोडमध्ये उपलब्ध आहे (इको, राइड आणि रश मोड).
River Indie launched: डिझाइन
डिझाइनच्या बाबतीत, याला सिग्नेचर ट्विन बीम हेडलॅम्प आणि एक टेल लॅम्प देण्यात आला आहे. ज्यामुळे ती इतर स्कूटर्सपेक्षा वेगळी आहे. तसेच यात असलेल्या क्लिप-ऑन हँडलबार चांगल्या ग्रीपसह ही हाताळणीस चांगली स्थिरता देते. ज्यामुळे स्कूटर पडल्यास ई-स्कूटर पॅनेलचे संरक्षण करण्यासाठी देखील कार्य करते. याशिवाय ही स्कूटर रायडर्सना सपोर्ट देण्यासाठी आणि राइडिंग पोझिशन सुधारण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर त्याच्या सेगमेंटमधील सर्वात रुंद सीटसह सादर करण्यात आली आहे. जी रायडरला अधिक आराम देण्याचे काम करते. यामध्ये दिलेला फ्रंट फूड पेग स्कूटर सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिसला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सस्पेन्शनमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी ट्विन रियर हायड्रॉलिक सस्पेंशन आणि टेलिस्कोपिक फ्रंट वापरण्यात आला आहे.
River Indie launched: किंमत
रिव्हर स्टार्टअप कंपनीने याची प्रारंभिक किंमत 1,25,000 रुपये आहे. कंपनी या स्कूटरची डिलिव्हरी या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये सुरू करू शकते.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI