Bike Riding Tips For Rain: भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत वाहन चालवणे खूप कठीण होऊन जाते. मुसळधार पावसाचा सामना करण्याबरोबरच वाहनचालकांना जोरदार वाऱ्याचाही सामना करावा लागतो. अशा हवामानात गाडी चालवताना खबरदारी घेतली पाहिजे. पावसाळ्यात रस्ते अपघातात वाढ होते, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी. पावसाळ्यात दुचाकी आणि स्कूटर चालवणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. रस्ते निसरडे झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढते. कधी कधी छोट्या चुकांमुळेही मोठा अपघात होतो. पावसाळ्यात रस्त्यावरील तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
रस्त्यावर पाणी भरले असेल तर थांबा
पावसाळ्यात ठिकठिकाणी रस्ते जलमय होतात. त्यामुळे अनेकवेळा रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले दिसत नाहीत. हा त्रास रात्रीच्या वेळी जास्त होतो. त्यामुळे जिथे पाणी भरले आहे, तिथे अजिबात गाडी चालवू नका.
हेल्मेट घालणे आवश्यक
तुम्ही कुठे जवळ ही जात असाल तरीही हेल्मेटशिवाय बाईक किंवा स्कूटर कधीही चालवू नका. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात हेल्मेट घाला. पावसात हेल्मेटच्या व्हिझरमुळे पावसाचे थेंब डोळ्यांवर पडत नाहीत, त्यामुळे दुचाकी चालवणे सोपे जाते. तसेच हेल्मेट तुम्हाला सुरक्षित ठेवते.
गाडी चालवताना अंतर ठेवा
पावसाळ्यात समोरच्या वाहनापासून नेहमी योग्य अंतर ठेवा. पावसात रस्त्यावर ट्रॅक्शन कमी होते, त्यामुळे योग्य वेळी ब्रेक लावला जात नाही. याशिवाय वाहनाचा हेडलाईट नेहमी चालू ठेवा.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI