Ratan Tata Birthday : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata), ज्यांना खरं तर कोणत्याही परिचयाची गरज नाही. पण तुम्हाला माहित आहे का? रतन टाटा यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट (Dream Project) होता. जो त्यांच्यासाठी सर्वात मोठा अपयश म्हणून ओळखला जातो. कोणते होते त्यांचे हे स्वप्न, जे पूर्ण होऊ शकले नाही?


2008 मध्ये साकार टाटांचे ते 'स्वप्न' 


2008 मध्ये ऑटो एक्सपोमध्ये रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट नॅनो कार प्रदर्शित करण्यात आली होती. प्रदर्शनाच्या वेळी टाटा नॅनोबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह होता. टाटा नॅनोची सगळीकडे चर्चा होत होती. रतन टाटांचे स्वप्न, ज्याच्याशी भारतातील एक मोठा वर्ग स्वत:ला जोडू पाहत होता. टाटा नॅनो हे रतन टाटांचे स्वप्न होते, पण काही कालावधीतच हा ड्रीम प्रोजेक्ट बुडाला. जाणून घ्या टाटा नॅनोचा ड्रीम प्रोजेक्ट का अपूर्ण राहिला?


'सामान्य लोकांची कार' 2009 मध्ये रस्त्यावर धावली


टाटा मोटर्सने 2009 मध्ये नॅनो कार लॉन्च केली. त्या काळात 'नॅनो' कार इतकी प्रसिद्ध झाली होती की टाटा मोटर्समध्ये या कारसाठी लोक वेटिंगवर होते. टीव्हीपासून वृत्तपत्रांपर्यंतच्या जाहिरातींमुळे सर्वसामान्यांमध्ये या कारबद्दल उत्सुकता निर्माण होऊ लागली. नॅनो कारची क्रेझ लहान मुले, वृद्ध तसेच तरुणांमध्ये दिसून आली. स्वत: रतन टाटा यांनी याला सर्वसामान्यांची गाडी म्हटले होते.


लाखात एक कार!


टाटा मोटर्सने नॅनो कार ही 'सामान्य लोकांची कार म्हणून सादर केली. रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना दुचाकीवर आपल्या कुटुंबाला घेऊन फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कारमध्ये फिरताना पाहायचे आहे. टाटा मोटर्सचा विश्वास होता की चार जणांचे छोटे कुटुंब दुचाकीपेक्षा कारमध्ये अधिक सुरक्षित असते. यामुळेच नॅनो कारची लॉन्चिंग किंमतही केवळ एक लाख ठेवण्यात आली होती.


अचानक कारचे उत्पादन थांबवले


नॅनो कारला सुरुवातीचे यश मिळाले, पण काही काळानंतर तिची विक्री कमी होऊ लागली. 2019 मध्ये टाटा नॅनोचे फक्त एक युनिट विकले जाऊ शकले. घटत्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सने 2018 मध्येच टाटा नॅनोचे उत्पादन थांबवले होते. BS-IV  एमिशन नॉर्म्स लागू झाल्यानंतर नॅनो कार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.


स्वस्त कार सर्वसामान्यांची पसंती का होऊ शकली नाही?


त्यादरम्यान टाटा नॅनोच्या अनेक वाहनांना आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. ज्याचा कारच्या प्रतिमेवर खोलवर परिणाम झाला. एवढेच नाही तर पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये झालेल्या गदारोळानंतर टाटांना तेथून गुजरातला प्रकल्प हलवावा लागला. त्यामुळे सर्वात स्वस्त कार म्हणून प्रसिद्ध झालेल्या नॅनोसाठी ही एक अडचण ठरली. किंबहुना त्या काळात 'स्वस्त कार' या टॅगमुळे लोक नॅनोपासून दूर जाऊ लागले.


रतन टाटांनी चार जणांचे कुटुंब पावसात बाईकवरून जाताना पाहिले..


एका मुलाखतीदरम्यान रतन टाटा म्हणाले होते की, त्यांनी चार जणांचे कुटुंब पावसात बाईकवरून जाताना पाहिले होते. त्यानंतर त्यांच्या मनात स्वस्त आणि सुरक्षित कार बनवण्याचा विचार आला. ज्या धूमधडाक्यात टाटा नॅनो रस्त्यावर धावली होती, ती त्याच शांततेने नाहीशी देखील झाली. आता नॅनो कार इलेक्ट्रिक वाहन म्हणून पुन्हा बाजारात दाखल होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.



आज भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म
 भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी  झाला. टाटा समुहाचे अध्यक्ष राहिलेल्या रतन टाटा यांना पद्म विभूषण आणि पद्म भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांना नवजाबाई टाटा यांनी त्यांचे पती रतनजी टाटा यांच्या निधनानंतर दत्तक घेतले होते. रतन टाटा यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून घेतले आणि माध्यमिक शिक्षण कॅथेड्रलमधूनच घेतले. त्यानंतर त्यांनी जॉन कॅनन कॉलेजमधून आर्किटेक्चरमध्ये बीएससी केले. त्यानंतर कॉर्नेल विद्यापीठातून 1962 मध्ये कम्युनिकेशन इंजिनीअरिंग आणि 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमचे शिक्षण घेतले. रतन टाटा 1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होते. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडले पण तरीही ते टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.  


Car loan Information:

Calculate Car Loan EMI