Pure Electric Scooter Fire: गेल्या काही महिन्यांत भारतात अनेक इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षा मानकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामध्ये ओला इलेक्ट्रिक (Ola Electric), जितेंद्र न्यू ईव्ही (Jitendra New EV), ओकिनावा (Okinawa) आणि प्युअर एनर्जी ईव्ही (Pure Energy EV) च्या इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. Pure ई-स्कूटरची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. गुजरातमध्ये पुन्हा एकदा एक इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Pure इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याची पाचवी घटना
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, Pure EV च्या EPluto 7G इलेक्ट्रिक स्कूटरला गुजरातमधील पाटण येथे आग लागली आहे. रिपोर्टनुसार, ही घटना घराबाहेर चार्जिंगसाठी प्लग करताना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र प्युअर एनर्जीच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याची ही पाचवी घटना आहे.
चालत्या स्कूटरमध्ये लागली आग
यापूर्वी प्युअर ईव्हीच्या चार ई-स्कूटर्सना आग लागली होती. प्युअर ईव्ही ई-स्कूटरला आग लागण्याची चौथी घटना गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये घडली. हैदराबादच्या घटनेत मालकाने सांगितले की, त्याच्या मित्रासोबत प्रवास करत असताना ई-स्कूटर अचानक बंद पडली. बॅटरीचा डबा उघडल्यानंतर धूर निघू लागला आणि नंतर त्याला आग लागली. एका वृत्तानुसार, ईव्ही मालकाने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
Pure EV ने यावर्षी एप्रिलमध्ये 2,000 इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवले होते. त्यांनी ETrance+ आणि EPluto 7G ई-स्कूटर्स रिकॉल केले होते. यातील EPluto 7G हे तेच मॉडेल आहे, ज्याला अलीकडेच हैदराबाद आणि गुजरातमध्ये आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, Pure EV इतर कुठूनही बॅटरी पॅक घेत नाही. अशा प्रकारे आगीच्या घटनांसाठी कंपनी स्वतः जबाबदार आहे.
Pure EV किती सुरक्षित?
Pure इलेक्ट्रिक स्कूटर खरोखर सुरक्षित आहेत का आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी Pure ईव्ही काय करत आहे? या मुद्द्यावर अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI