Toyota Urban Cruiser HyRyder SUV: एसयूव्ही कार सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढताना दिसत आहे. भारतात एक मोठा ग्राहक वर्ग आहे, जो खास करून या सेगमेंटमधील कार खरेदी करण्यास पसंती दर्शवतो. अशातच आता आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Toyota आपली नवीन एसयूव्ही Toyota Urban Cruiser HyRyder लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र कंपनीने ही कार सादर करण्यापूर्वीच याचे फोटो लीक झाले आहेत. नवीन टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरच्या रूपात लॉन्च होणार आहे. कंपनी 1 जुलै 2022 रोजी सादर करणार आहे. 


आगामी टोयोटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही पूर्णपणे कोणत्याही कव्हरशिवाय दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. फोटो पाहून हे कदाचित कारचे 'टॉप ऑफ द लाईन' व्हेरिएंट असल्याचे दिसत आहे. जे ब्लॅक आणि रेड रंगाच्या ड्युअल टोन फिनिशमध्ये दिसत आहे. याचे फोटो लीक होण्याआधी या कारचे नाव Hyryder असे सांगितले जात होते. मात्र आता लीक झालेल्या फोटोवरून आता हे उघड झाले आहे की, या कारला टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर असे नाव देण्यात आले आहे.


कंपनीची अर्बन क्रूझर ही समान कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी बाजारात ब्रेझा आणि नेक्सॉन सारख्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीशी स्पर्धा करते. टोयोटा अर्बन क्रूझर ही देखील टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या भागीदारीत बनवण्यात आलेले उत्पादन आहे. ही मारुती सुझुकी ब्रेझाची रिबॅज केलेली कार आहे. पण कंपनीने आता यांच्या पुढील एक उत्पादनावर काम करत आहे. जे ह्युंदाई क्रेटाला बाजारात आव्हान देईल. अशातच पाहावं लागेल की, ही कार भारतीय बाजारात आपला दबदबा निर्माण करू शकणार की नाही.




इंजिन 


नवीन टोयोटा एसयूव्हीमध्ये मारुती सुझुकीत असलेले 1.5 लीटर K15B पेट्रोल इंजिन सौम्य हायब्रिड (ऑल व्हील ड्राइव्ह) आणि मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान (फ्रंट व्हील ड्राइव्ह) सह दिले जाऊ शकते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह दिले जाऊ शकते.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI