New Audi A8l 2022: कार उत्पादक कंपनी Audi India पुढील महिन्यात 12 जुलै रोजी भारतात आपली नवीन Audi A8L एसयूव्ही लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. A8L ही लक्झरी कार निर्मात्याची फ्लॅगशिप सेडान आहे. ही कार नवीन कॉस्मेटिक अपडेट्स आणि फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे. नवीन A8L साठी प्री-बुकिंग देखील सुरु झाली आहे. ग्राहक 10 लाख रुपयांच्या टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात. ही कार कंपनीच्या डीलरशिपद्वारे किंवा ऑनलाइन देखील बुक केली जाऊ शकते.


नवीन Audi A8L मध्ये करण्यात आलेल्या अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर, यात मोठा फ्रंट क्रोम ग्रिल, स्लीक हेडलॅम्प, टेललॅम्प, नव्याने डिझाइन केलेले अलॉय व्हील, नवीन फ्रंट आणि बॅक बंपर देण्यात आले आहेत. इंटिरिअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात व्हर्च्युअल कॉकपिट, MIB3 ऑपरेटिंग सिस्टम, मागील सीटसाठी रिक्लिनरसह रिअर Relaxation पॅकेज, फूट मसाजर आणि इतर अनेक स्टँड-आउट फीचर्स देण्यात आले आहे. नवीन Audi A8L ची केबिनही खूप आलिशान आहे. कारमध्ये मागील प्रवाशांसाठी 10.1-इंच टचस्क्रीन डिस्प्लेसह अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते. केबिनला फोल्डिंग सेंटर कन्सोल टेबल आणि कूलर कंपार्टमेंट देखील मिळते.


इंजिन 


Audi A8L चे इंजिन देखील जबरदस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या नवीन सेडानमध्ये 48V सौम्य-हायब्रिड 3-लीटर पेट्रोल इंजिन देऊ शकते. हे इंजिन 335 बीएचपी पॉवर आणि 500 एनएम कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय कारमध्ये क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग डायनॅमिक्स देण्यात आले आहेत.


दरम्यान, ऑडी लवकरच भारतात स्थानिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करू शकते. कंपनीने 2033 पासून जागतिक स्तरावर पूर्णपणे इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाहता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वस्त उत्पादनासाठी अनुकूल बाजारपेठ शोधत आहे. एकदा भारतात लॉन्च झाल्यानंतर ऑडी A8 L ची स्पर्धा BMW 7 आणि मर्सिडीज-बेंझ एस-क्लासशी होईल.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI