मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट पाकिस्तानला (Pakistan) इशारा दिला आहे. देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून देण्याचे आदेश देण्यात आले असून पाकिस्तानसोबतचे व्यापारही बंद केले जाणार आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानमध्ये महागाई (Inflation) वाढल्याचे वृत्त सातत्याने मीडियात झळकत होते. त्यातच, भारतातील सर्वसामान्यांची आवडती बजेट कार असलेल्या स्विफ्टची किंमत भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये अधिक महाग आहे. Maruti Suzuki Swift (car) ही ग्राहकांची विश्वासार्ह आणि बजेटमधील कार आहे. भारतीय बाजारपेठेत या कारची शोरुम किंमत 6.49 लाख रुपये एवढी असून टॉप मॉडेल 9.64 लाख रुपयांपर्यंत जाते. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये ही कार जास्त महाग आहे.
पाकिस्तानमध्ये Maruti Suzuki Swift कारच्या बेस मॉडेलची किंमत PKR 4,416,000 रुपये एवढी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांत ह्या कारची किंमत 13.42 लाख रुपये आहे. या कारचे टॉप मॉडेल GLX CVT ची किंमत PKR 4,719,000 रुपये म्हणजेच भारतीय चलनानुसार 14.33 लाख रुपये एवढी आहे. या किंमतीत भारतात एसयुव्हीसारख्या मोठ्या गाड्यांची खरेदी करता येऊ शकते. आधीच आर्थिक तंगीत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना एका बजेट कारसाठी एवढी मोठी रक्कम देणे एक स्वप्नवत बनलं आहे. त्यामुळे, भारतात पाकिस्तानच्या तुलनेत स्विफ्ट कार खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
पाकिस्तानमध्ये स्विफ्ट एवढी महाग का?
पाकिस्तानमध्ये विकल्या जाणाऱ्या स्विफ्ट कारमध्ये 1200 cc इंजिन देण्यात आलंय. यामध्ये मॅन्यूअल आणि CVT ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. सेफ्टीचा विचार केल्यास या कारमध्ये 6 एअर बॅग्ज आहेत. ABS, EBD, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, रिव्हर्स कॅमरा आणि रियर पार्किंग सेंसॉरचाही सहभाग आहे.
भारतातील स्विफ्ट कारमध्ये काय ?
भारतात विकल्या जाणाऱ्या Maruti Swift मध्ये1.2-लीटर 3-सिलेंडर Z सीरीज इंजन आहे. ही कार 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमैटिक ट्रान्समिशन सोबत विक्रीस उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलाल तर 9-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस एंड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले, 6-स्पीकर ऑडियो सिस्टम आणि वायरलेस फोन चार्जिंग आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने कारमध्ये 6 एयरबॅग, हिल-होल्ड असिस्ट, ISOFIX चाइल्ड सीट एंकरेज, रियर कॅमेरा आणि पार्किंग सेंसर यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
हेही वाचा
Car loan Information:
Calculate Car Loan EMI