Car Comparison: वाहन उत्पादक कंपनी मारुतीने साल 2000 मध्ये पहिल्यांदा आपली Alto कार भारतात लॉन्च केली होती. आकाराने लहान आणि खिशाला परवडणारी ही कार बघता-बघता भारतीयांची आवडती कार बनली. या कारने सामान्य माणसाचे कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे, असं म्हणतात. म्हणूनच की काय ही कार कंपनीने लॉन्च केल्यापासूनच सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. कंपनीने 2000 सालापासून ते आतापर्यंत यात अनेक बदल करून ही कार वेळोवेळी भारतात अपडेट करून लॉन्च केली आहे. आजच कंपनीने या कारचा लेटेस्ट मॉडेल 2022 Alto K10 देशात लॉन्च केला आहे. अशातच आपण याच्या जुन्या मॉडेलपेक्षा या कारमध्ये कंपनीने काय नवीन फीचर्स किंवा अन्य एलिमेंट्स दिले आहेत याची तुलना करणार आहोत.
New Alto K10 Vs Old Alto Engine
जुन्या अल्टोमध्ये 796cc 3-सिलेंडर, 4-व्हॉल्व्ह इनलाइन पेट्रोल इंजिन देण्यात आले होते. जे 6200 rpm वर 46.3 bhp पॉवर आणि 3000 rpm वर 62 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनने ही कार 19.7 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम. ही कार फक्त मॅन्युअल पर्यायात येते.
नवीन Alto K10 मध्ये 1L k-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 67 hp ची पॉवर आणि 3,500 rpm वर 89 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच ही कार 24.9 kmpl चे मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायात येते.
New Alto K10 Vs Old Alto Dimensions
जुनी अल्टो ही 5 सीटर आहे. ज्याची लांबी 3495 मिमी, रुंदी 1475 मिमी, उंची 1460 मिमी आणि व्हीलबेस 2360 मिमी आहे.
2022 Alto K10 5-सीटर पर्यायामध्ये येते. ज्याची लांबी 3530mm, रुंदी 1490mm आणि उंची 1520mm आहे. त्याचा व्हीलबेस 2380mm आहे.
New Alto K10 Vs Old Alto Features
जुन्या अल्टोमध्ये इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, ग्लोव्ह कंपार्टमेंट, मॅन्युअली अॅडजस्टेबल रिअर व्ह्यू मिरर, 12 इंच अलॉय व्हील, ब्रेक असिस्ट रिअर सीट बेल्ट, साइड इफेक्ट बीम, इंजिन चेक वॉर्निंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी या सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
2022 Maruti Suzuki Alto K10 ला ऑल पॉवर विंडो, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल, ऑक्झिलरी केबल आणि ब्लूटूथ सपोर्ट, ORVMs, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS या सारखे फीचर्स मिळतात. यात ब्लॅक इंटीरियर देण्यात आले आहे. ही कार 6 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये कस्टमायझेशनचे दोन पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
संबंधित बातमी:
प्रतीक्षा संपली! नवीन दमदार Alto K10 भारतात लॉन्च, देते 24.9 Km चा दमदार मायलेज
Car loan Information:
Calculate Car Loan EMI