Ola S1 Air & Honda Activa Comparison: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार वाढत आहे. यामुळे भारतात एकापाठोपाठ एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च होत आहेत. मात्र इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये वाढ झाल्यानंतरही भारतात पेट्रोल स्कूटरच्या सेगमेंटमध्ये खास ओळख असलेल्या होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या विक्रीत कोणतीही घट झालेली नाही. अलीकडेच Ola ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air लॉन्च केली आहे. ज्याच्या किंमतीमध्ये Activa च्या तुलनेत थोडा फरक आहे. आक आपण या दोन्ही स्कूटरची तुला करून कोणत्या बाबतीत दोन्हीपैकी कोणती चांगली आहे, हे जाणून घेणार आहोत.


Activa 


Honda Activa स्कूटरमध्ये 109.51 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 7.68 bhp पॉवर आणि 8.79 Nm टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर 10.55 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम आहे. याची टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास आहे.


Ola S1 Air


इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत ही स्कूटर खूप चांगली आहे. ही स्कूटर केवळ 4.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम आहे. तर ही स्कूटर 9.8 सेकंदात 60 किमी प्रतितास वेग गाठू शकते. ही स्कूटर एका चार्जमध्ये 101 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तसेच ताशी 85 किलोमीटर वेगाने धावू शकते.


किती आहे वजन? 


Ola S1 Air वजनाने खूपच हलकी आहे आणि या स्कूटरचे वजन फक्त 99 किलो आहे. तर Honda Activa चे वजन या पेक्षा किंचित जास्त आहे. याचे वजन 106 kg आहे.


फीचर्स 


Honda Activa मध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, LED हेडलॅम्प, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सायलेंट स्टार्टर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. 


S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क्स, सात-इंचाचा डिस्प्ले, इको आणि राइडिंगसाठी पॉवर मोड, 34 लीटर बूट स्पेस, टेललॅम्पसह एलईडी हेडलॅम्प अशी फीचर्स देण्यात आले आहेत.


किंमत 


Ola S1 Air 84,999 च्या प्रास्ताविक एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ग्राहक ही स्कूटर फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकतात. तर Honda Activa ची एक्स-शोरूम किंमत 73086 रुपये आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Volkswagen Taigun : Volkswagen ची First Anniversary Edition Taigun कार भारतात लॉन्च; पॉवरफुल इंजिनसह मिळतील 'हे' भन्नाट फिचर्स


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI