OLA Electric Scooter Problems: ओला इलेक्ट्रिक आपल्या S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरसह नवीन विक्रम रचण्याचा दावा करत असताना, त्यांचे अनेक ग्राहक ई-स्कूटरबद्दल तक्रार करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची गुणवत्ता आणि खराब कामगिरीशी संबंधित अनुभव शेअर केले आहेत.
Ola S1 Pro च्या कामगिरी आणि बॉडी फीचर्सबद्दल तक्रारी करण्यात आल्या आहेत. श्रीनाद मेनन नावाच्या एका ग्राहकाने आपल्या ओला स्कूटरचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये स्कूटरचा पुढील भाग तुटलेला दिसत आहे. वापरकर्त्याने तक्रारीत म्हटले आहे की, S1 Pro चे फ्रंट सस्पेन्शन खूपच कमकुवत आहे आणि कमी-स्पीड राइडिंग दरम्यान ते तुटले. अपघातानंतर समोरचा टायर स्कूटरपासून पूर्णपणे वेगळा झाला असल्याचा दिसत आहे. जो फोटोत स्पष्टपणे दिसत आहे.
ग्राहकाने सोशल मीडियावर केली तक्रार
वापरकर्त्याने त्याच्या पोस्टमध्ये ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल आणि ओला इलेक्ट्रिकच्या ट्विटर हँडलला टॅग करत तक्रार केली आहे. कमी वेगाने स्कूटर चालवताना त्याला या गंभीर आणि धोकादायक गोष्टीचा सामना करावा लागल्याचे युजरने सांगितले. ओला इलेक्ट्रिकने रिप्लेसमेंट किंवा डिझाईन बदलण्याचा विचार केला पाहिजे, असेही या युजरने कंपनीला आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.
आणखी एका ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्येही दोष आढळला
श्रीनादच्या या पोस्टमध्ये एका ट्विटर युजरने तुटलेल्या लाल रंगाच्या S1 Pro चे फोटो पोस्ट केले आहे. या S1 Pro स्कूटरच्या फ्रंट एंडचे देखील नुकसान झाल्याचे दिसत आहे. याआधी अनेक वापरकर्त्यांनी ओला स्कूटरची बॅटरी अचानक संपल्याची आणि स्कूटर हाय स्पीडमध्ये रिव्हर्स मोडमध्ये जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI