Ola Electric Car: गेल्या अनेक दिवसांपासून ओलाच्या बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कारची चर्चा आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्यानंतर ग्राहकांमध्ये ती खरेदी करण्यासाठी उत्सुकता वाढली. कारण ही इलेक्ट्रिक स्कूटर दिसायला तर वेगळी आहेच, मात्र याची रेंज देखील बाजारात उपलब्ध असलेल्या स्कूटर पेक्षा अधिक आहे. म्हणून ओलाच्या इलेक्ट्रिक कारबद्दलही ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. या कारकडून कंपनीला बऱ्याच अपेक्षा आहे. या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले जाऊ शकतात, जे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये उपलब्ध नाही, अशी अपेक्षा आहे. कंपनी ही कार 2024 मध्ये बाजारात उतरवू शकते. कंपनीने आपल्या या कारच्या फीचर्सबद्दल वेळोवेळी खुलासा करत आहे. Ola ची पहिली इलेक्ट्रिक कार फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे फ्यूचरिस्टिक स्टाइल थीम असलेली प्रीमियम सेडान असेल.
संभावित रेंज
ओला इलेक्ट्रिकने असा दावा केला आहे की, ही कार मोठ्या बॅटरी पॅकसह 500 किमीची रेंज देईल आणि चार सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
साइड मिरर मिळणार नाही
या कारच्या इतर डिझाइनबद्दल सांगायचे तर, मागील दृश्यासाठी दरवाजावर कोणताही आरसा मिळणार नाही. कारण या कारमध्ये कॅमेरे दिले जातील, जे अधिक Aerodynamics आहेत. या कारच्या आतील भागात टू-स्पोक स्टीयरिंग व्हील देखील पाहायला मिळू शकते. यात पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल. तसेच यात सनरूफ देखील मिळू शकते.
काय आहे कंपनीची योजना?
ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विपरीत कंपनीची इलेक्ट्रिक कार ही प्रीमियम इलेक्ट्रिक सेडान असेल. सध्या या सेगमेंटमध्ये भारतात दुसरी कोणतीही इलेक्ट्रिक सेडान उपलब्ध नाही. सेगमेंटमध्ये सध्या बहुतांशी इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर्स आणि SUV चा समावेश असल्याने, Ola ला हा EV सेगमेंट कॅप्चर करण्यासाठी मोठी एंट्री करायची आहे, जसे कंपनीने आपल्या स्कूटरसाठी केले होते.
दरम्यान, ओला इलेक्ट्रिक एकपेक्षा अधिक इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते. मात्र प्रीमियम स्पेसमधील ही पहिली कार असेल. टीझरमध्ये दिसत असल्याप्रमाणे, ओलाची नवीन कार ही सेडान आणि क्रॉसओव्हरचे मिश्रण असू शकते. तर याचा आतील भाग अगदी सिम्पल पद्धतीचा असू शकतो. कंपनीने अद्याप या कारबद्दल अधिक माहिती जरी केलेली नाही आहे. मात्र कंपनी या कारची अधिक माहिती लवकरच जाहीर करू शकते.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI