Mumbai: भारतातील प्रीमियम इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या ODC इलेक्ट्रिक कंपनीने आपली नवी Racer Neo इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर खास करून रोजचा प्रवास करणाऱ्यांसाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी, ऑफिसला जाणाऱ्यांसाठी आणि डिलिव्हरी पार्टनर्ससाठी तयार करण्यात आली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत फक्त ₹52,000 (Graphene बॅटरीसाठी) असून, ₹63,000 (Lithium-ion बॅटरीसाठी) पर्यंत जाते. ही किंमत एक्स-शोरूम आहे.
Racer Neo ही एक low-speed EV स्कूटर आहे. म्हणजेच तिचा जास्तीत जास्त वेग 25 km/hr इतकाच आहे. त्यामुळे या स्कूटरसाठी ना लायसन्स लागतं, ना वाहनाची नोंदणी. यामुळे शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही ही स्कूटर चालवता येईल.
ही स्कूटर दोन प्रकारच्या बॅटरी पर्यायांमध्ये..
Graphene बॅटरी (60V, 32Ah किंवा 45Ah)
Lithium-ion बॅटरी (60V, 24Ah) या स्कूटरला एका चार्जमध्ये 90 ते 115 किलोमीटर पर्यंत रेंज मिळते. चार्जिंगसाठी 4 ते 8 तास लागतात.
कोणकोणते स्मार्ट फिचर्स?
LED डिजिटल मीटर
Cruise Control
USB चार्जिंग पोर्ट
Keyless Start/Stop
Reverse आणि Parking मोड
Repair मोड
मोठं बूट स्पेस
पाच रंगांमध्ये स्कुटर उपलब्ध
ही स्कूटर 5 रंगांमध्ये मिळते – Fiery Red, Lunar White, Titanium Grey, Pine Green आणि Light Cyan. या लाँचबाबत ODC चे CEO नेमिन वोरा म्हणाले की, “Racer Neo ही आमच्या जुन्या Racer स्कूटरची अपग्रेडेड आवृत्ती आहे. ही स्कूटर जास्त विश्वासार्ह, आधुनिक आणि परवडणारी आहे. आमचं उद्दिष्ट म्हणजे भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं.”
कंपनीचं नेटवर्क आणि इतर स्कूटर्स
ODC इलेक्ट्रिक कंपनीची सुरूवात 2020 साली झाली होती. आज देशभरात त्यांचे 150 पेक्षा जास्त डीलर पॉईंट्स आणि ऑनलाइन खरेदी पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीकडे सध्या एकूण 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स आहेत, ज्यात low-speed आणि high-speed स्कूटर, डिलिव्हरी EVs, स्पोर्ट बाईक, आणि कॉम्युटर बाईक यांचा समावेश आहे.
ODC च्या इतर काही खास स्कूटर्स:
E2Go Lite, E2Go+, E2Go Graphene – लो-स्पीड स्कूटर्स
V2 Graphene, V2+, V2 Lite – मोठ्या बूट स्पेससह स्कूटर्स
Snap, Hawk LI – हाय-स्पीड स्कूटर्स, ज्यात पोर्टेबल बॅटरी, क्रूझ कंट्रोल, म्युझिक सिस्टीम आहे
Trot 2.0 – डिलिव्हरीसाठी खास डिझाइन केलेली ई-स्कूटर
EVHokis, EVHokis Lite – स्पोर्ट लुक असलेल्या बाईक्स
Vader – मोठा टचस्क्रीन, 5 ड्राइव मोड, 18 लिटर स्टोरेज असलेली इलेक्ट्रिक बाईक
ही सर्व मॉडेल्स EV मार्केटमध्ये ODC ला वेगळं स्थान देतात. Racer Neo ही स्कूटर लाँच करून कंपनीने परवडणाऱ्या आणि स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटरच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ही स्कूटर स्टाईल, फीचर्स आणि किंमतीचा उत्तम मेल देणारी आहे.
हेही वाचा:
TATA Harrier ev : टाटा मोटर्सकडून नवीन हॅरियर.इव्हीचे उत्पादन सुरू, मोठ्या प्रमाणावर बुकिंग
Car loan Information:
Calculate Car Loan EMI