Silence S01 Plus Specifications: दुचाकी उत्पादक कंपनी सायलेन्सने आपली नवीन सायलेन्स S01 प्लस इलेक्ट्रिक स्कूटर यूकेमध्ये लॉन्च केली आहे. सायलेन्स S01 प्लस ही कंपनीच्या आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या S01 इलेक्ट्रिक स्कूटरचा स्पोर्टियर व्हर्जन आहे. या नवीन ई-स्कूटरसह कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणीमध्ये आता एकूण 6 इलेक्ट्रिक स्कूटर झाले आहेत. ज्यामध्ये S01 प्लस, S01 अर्बन, S01 कनेक्टेड, S02 अर्बन, S02 बिझनेस आणि S02 बिझनेस प्लसचा समावेश आहेत.
या स्कूटरची कंपनी यावर्षी मर्यादित लिमिटेड विक्री करणार आहे. ग्राहक S01 Plus स्कूटर कंपनीच्या वेबसाइटवरून बुक करू शकतात. याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत £6,795 म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 6.50 लाख रुपये आहे.
फीचर्स
Silence S01 Plus, Silence S01 कनेक्टेड इलेक्ट्रिक स्कूटरवर आधारित आहे. ज्याची किंमत £५,६९५ (अंदाजे ५.४५ लाख) आहे. दोघांचे डिझाइन सारखेच आहे. S01 Plus स्पोर्टी अँथ्रासाइट ग्रे कलर थीममध्ये येते. सायलेन्स S01 प्लसला गोल हेडलॅम्प, स्कल्प्टेड फ्रंट फॅशिया, टिंटेड विंडस्क्रीन, ट्रेंडी रीअर व्ह्यू मिरर, सिंगल पीस सीट आणि लाँग टेल सेक्शन मिळते.
पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत सायलेन्स S01 प्लस पुश टू पास मोडसह येतो. ज्यामध्ये ग्राहक सुमारे 109 किमी प्रतितास वेग प्राप्त करू शकतात. याचे सस्पेन्शन सिस्टीम देखील अॅडजस्टेबिलिटी पर्यायासह अपडेट करण्यात आले आहे. सायलेन्स S01 प्लस इलेक्ट्रिक स्कूटर 7.5 kW मोठ्या क्षमतेच्या मोटरद्वारे समर्थित आहे. जी 12.23 PS ची पॉवर निर्माण करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकूण 4 राइड मोड ऑफर करते. ज्यात इको, सिटी, स्पोर्ट आणि रिव्हर्स गीअर्स उपलब्ध आहेत. ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर याला CBS सह दोन्ही बाजूंनी डिस्क ब्रेक मिळतात. WMTC मानकानुसार, याची रेंज सुमारे 137 किमी आहे. ही स्कूटर 240V चार्जरसह फक्त 6-8 तासांमध्ये चार्ज होऊ शकते. कंपनी स्कूटरसह 2 वर्षांची आणि बॅटरीसह 3 वर्षांची वॉरंटी देखील देते.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI