New Maruti WagonR launched: मारुती सुझुकीनं आज 2022 वॅगनआर फेसलिफ्ट कार लाँच केलीय. सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार सुझुकीनं भारतीय बाजारात दाखल केलीय. नवीन वॅगनआरची सुरुवातीची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. त्याच्या टॉप-मॉडेलची किंमत 7.10 लाख रुपयांपर्यंत जाते. वॅगनआरच्या इंटिरिअर आणि डिझाइनमध्ये बरेच काही अपडेट करण्यात आलंय.  


देशातील सर्वात लोकप्रिय वेगनआरला नवीन रुपात अपडेट्स करून कंपनीनं बाजारात दाखल केलीय. या कारमध्ये उत्कृष्ट फिचर्सचा समावेश करण्यात आलाय. अपडेट केलेल्या वॅगनआरला पेट्रोल (Petrol) व्हेरियंटमध्ये ISS आणि AGS हिल होल्ड असिस्ट सारखी काही नवीन फीचर्स देण्यात आलीय.


2022 मारुती वॅगनवार फेसलिफ्टची किंमत
2022 मारुती वॅगनआर फेसलिफ्टला 5 लाख 39 हजार 500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सोबत लाँच करण्यात आलंय. २०२२ नवीन वेगनआर फेसलिफ्ट जुन्या मॉडलच्या तुलनेत 23 हजार रुपयांनी महाग आहे. जुन्या मॉडलची किंमत 5.16 लाख रुपयांपासून सुरू होते.  नवीन वेगनआर फेसलिफ्ट ट्रिम लेवल 13 व्हेरियंट्समध्ये लॉन्च करण्यात आली. ज्याची किंमत 5.39 लाख रुपये ते 7.10 लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत आहे. वेगनआर फेसलिफ्टच्या सीएनजी व्हेरियंट्स सुद्धा आहे. ज्याची एक्स शोरूम किंमत 6.34 हजार इतकी आहे.


मारुती सुझुकी वॅगनआर सर्वात यशस्वी हॅचबॅक कार
मारुती सुझुकी वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेतील कंपनीची सर्वात यशस्वी हॅचबॅक कार आहे. 1999 मध्ये लॉन्च झाल्यापासून, वॅगनआर सतत विकसित होत आहे. या कारचं फिचर्स आणि डिझाईन ग्राहकांना आकर्षित करत आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI