Hero Xpulse 200 4V Rally Edition: ऑफरोडींग बाईक रायडींग करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Hero MotoCorp ने ऑफरोडींगसाठी बेस्ट असलेल्या आपल्या Xpulse 200 4V चा Rally Edition लॉन्च केला आहे. नवीन Hero Xpulse 200 4V Rally Edition बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.52 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Hero MotoSports रॅली बाईकपासून प्रेरित या बाईकला उत्तम ऑफरोडिंग क्षमतेसाठी फॅक्टरी-फिटेड रॅली किट देण्यात आले आहे. या बाईकची प्री-बुकिंग 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.


नवीन Xpulse 200 4V Rally Edition बाईक खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक 22 जुलै रोजी दुपारी 12 ते 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत Hero MotoCorp च्या अधिकृत वेबसाइटवर ही बाईक ऑनलाइन बुक करू शकतात. या बाईकच्या अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर, Xpulse 200 4V च्या फॅक्टरी-फिटेड रॅली किटला 250 मिमी प्रवासासह एक लांब आणि पूर्णपणे अ‍ॅडजेस्टेबल करण्यायोग्य फ्रंट सस्पेंशन देण्यात आले आहे.


Hero Xpulse 200 4V Rally Edition मध्ये 199.6cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, फ्युएल-इंजेक्‍टेड, 4-स्ट्रोक, 4-व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आले आहे. हेच इंजिन Xpulse 200 4V बाईकमध्येही मिळते. हे इंजिन 18.9 bhp पॉवर आणि 17.35 Nm पीक टॉर्क जनरेट करते. जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात DRL सह एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी फीचर्सही आहेत.


याच्या सीटची उंची 885 मिमी, हँडलबार राइसर 40 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 270 मिमी (स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 50 मिमी जास्त), 1426 मिमी (स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 26 मिमी जास्त) आहे. चांगल्या ऑफरोडिंगसाठी बाईकला उत्तम राइडिंग डायनॅमिक्स मिळते. यात विस्तारित गियर लीव्हर आणि 21-इंच फ्रंट आणि 18-इंच मागील स्पोक व्हीलसह ड्युअल-पर्पज टायर देखील मिळतात.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI