Electric Car Of Mercedes: लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ  (Mercedes Benz) इंडियाने (India) आपली इलेक्ट्रिक सेडान मर्सिडीज एमजी ईक्यूएस इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार AMG EQS 53 4MATIC + या एकाच प्रकारात सादर केली आहे. याची किंमत कंपनीने 2.45 कोटी (एक्स-शोरूम) रुपये इतकी ठेवली आहे. मर्सिडीज-बेंझ ईक्यूएस कंपनीच्या नवीन एस-क्लास सेडानच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे.


भारतातील मर्सिडीज-बेंझ EQC नंतर कंपनीची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. सुरुवातीला कार CBU रुटने भारतात आणली गेली होती. परंतु नंतर स्थानिकरित्या असेंबल केलेली EQS 580 लॉन्च केली जाईल. MG EQS ही कंपनीची दुसरी लाँग रेंज इलेक्ट्रिक कार आहे. ज्याची रेंज 529-586 किमी पर्यंत असणार आहे. कंपनीने यामध्ये 108.7 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे. MG EQS 4MATIC+ मध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स वापरण्यात आल्या आहेत.


दोन्ही एक्सलवर, कंपनीने प्रत्येकी एक इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे. जी एकत्रितपणे 509 bhp ची कमाल पॉवर आणि जास्तीत जास्त 828 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त 4.1 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. मर्सिडीज-बेंझ EQS ला एरोडायनामिक डिझाइन दिले आहे जे हवेचा दाब कमी करते आणि त्यास अधिक श्रेणी देते. मर्सिडीजने या SUV मध्ये नवीन MBUX हायपरस्क्रीनचा वापर केला आहे. ही हायपरस्क्रीन तीन वेगवेगळ्या स्क्रीन जोडून एक मोठी स्क्रीन तयार करते. ही स्क्रीन डॅशबोर्डच्या पूर्ण रुंदीमध्ये पसरते. MBUX स्क्रीन, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मनोरंजन प्रणाली दोन्ही म्हणून काम करते. कंपनीने ही कार एकूण 6 कलर ऑप्शनमध्ये सादर केली आहे.


ही कार 200 kW फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. यासह कंपनीने एक स्टॅंडर्ड 11 kW चार्जर आणि आणखी 22 kW फास्ट चार्जर उपलब्ध करून दिला आहे. जे पर्यायी असतील. साध्या 240 व्होल्ट वॉल सॉकेटने चार्ज करण्यासाठी पूर्ण 11 तास लागतात. दरम्यान, कंपनी ईक्यू ब्रँड अंतर्गत फ्लॅगशिप सेडान EQA, EQB, EQE आणि EQS आणणार आहे. कंपनी 2025 पर्यंत 25 नवीन प्लग-इन हायब्रिड मॉडेल्स आणणार आहे. पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात या गाड्या लॉन्च करणार आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI