Volkswagen Tiguan SUV: जर्मन ऑटोमेकर Volkswagen ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. फॉक्सवॅगन (Volkswagen) नियमित आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फिचर्स आणि अपडेटेड कार मॉडेल्स लाँच करत असते. आता कंपनी लवकरच भारतात आपली टिगुआन (Tiguan) क्रॉसओव्हरची थर्ड जनरेशन लाँच करणार आहे. याआधी कंपनीने या कारचे फिचर्स, नवीन डिझाईन, अपडेटेड इंजिन ऑप्शन ग्राहकांसमोर सादर केले आहेत.  टिगुआन (Tiguan) ही एसयूव्ही फॉक्सवॅगन ग्रुपची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, जी 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.


नवीन फॉक्सवॅगन टिगुआन 2024 ची डिझाईन


या कारच्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर, यात स्लीक आयक्यू लाईट, एचडी मॅट्रिक्स हेडलाईट्स 38,400 मल्टी-पिक्सेल एलईडीसह देण्यात येणार आहेत. ज्यांना एका पातळ एलईटी पट्टीशी जोडण्यात येईल, याच्या मध्ये एक मोठा काळा पॅनेल मोठ्या एअर इनटेकसोबत पाहायला मिळेल. गाडीच्या मागच्या साईडला एक एलईडी टेल लाईट देण्यात आली आहे, ज्यात तीन वेगळे-वेगळे एलईडी क्लस्टर असतील. यासोबतच यात नव्याने डिझाईन केलेले 20 इंट ड्युअल-टोल अलॉय व्हील देखील उपलब्ध आहेत, जे दिसायला अगदी आकर्षक आहेत.


नवीन फॉक्सवॅगन टिगुआन 2024 कारचे फिचर्स


केबिन फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन टिगुआनमध्ये 15.1 इंचांची फ्रीस्टँडिंग इन्फोटेन्मेंट सिस्टीम, 10.25 इंचांची डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि एक नवीन डिझाईनचा डॅशबोर्ड मिळणार आहे. गियर लिव्हरला स्टेअरिंगसोबत जोडलं आहे, यासोबतच यात HUD डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.


याशिवाय गाडीत अन्य सुविधांमध्ये सीट्सला मसाज फिचर देण्यात आले आहेत, फ्रंट वेन्टिलिटेड सीट्सला हे फिचर देण्यात आलं आहे. याशिवाय मल्टि-झोन क्लाईमेट कंट्रोल, अॅम्बिएंट लाईटिंग, पॅनोरॅमिक सनरुफ, इनबिल्ट ओएलईडी स्क्रिनसह एक रोटरी कंट्रोलर, एडीएएस, पार्क असिस्ट प्रो, रिमोट पार्किंगसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.


नवीन फॉक्सवॅगन टिगुआन 2024 पॉवरट्रेन


पॉवरट्रेन आणि गियरबॉक्ससह एसयूव्हीमध्ये मल्टिपल इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यात 1.5-l पेट्रोल, 2.0-l पेट्रोल, 2.0-l डिझेल आणि 1.5-l पेट्रोल-हायब्रिड पॉवरट्रेन मिळणार आहेत. प्लग-इन हायब्रिडमध्ये 19.7 kWh बॅटरी पॅक दिला गेला आहे, ज्यासाठी कंपनी 100 किलोमीटरपर्यंतच्या ड्राईव्हिंग रेंजचा दावा करते. सर्व इंजिनला 7-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत जोडलं गेलं आहे, पण  प्लग-इन हायब्रिडमध्ये 6-स्पीड डीएसजी दिला गेला आहे.


फॉक्सवॅगन टिगुआन या गाड्यांना देणार टक्कर


नवीन फॉक्सवॅगन टिगुआन 2024 ही कार किया स्पोर्टज (Kia Sports) आणि ह्युंडाई टक्सन (Hyundai Tucson) या गाड्यांशी मुकाबला करणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


2023 Kia Seltos: नवीन Kia Seltos ला बाजारात प्रचंड मागणी; अवघ्या 2 महिन्यांत 50,000 हून अधिक बुकिंग, किंमत पाहिली?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI