Maruti Suzuki S Presso CNG: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली  S-Presso हॅचबॅकचा नवीन 2022 CNG प्रकार लॉन्च केला आहे. ही कार कंपनीने  LXi आणि VXi या दोन प्रकारात लॉन्च केली आहे. यात  LXi S-CNG ची किंमत 5.90 लाख रुपये आणि VXi S-CNG ची किंमत 6.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेण्यात आली आहे. नवीन S-Presso S-CNG मध्ये डिझाइन आणि फीचर्सच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र कंपनीने सीएनजीवर चालण्यासाठी ड्युअल जेट इंजिन अपडेट केले आहे.


इंजिन 


नवीन S-Presso CNG 1.0 ड्युअल जेट इंजिन 5500 rpm वर 66 Bhp पॉवर आणि 3500 rpm वर 89 Nm टॉर्क जनरेट करते. असं असलं तर CNG वर चालत असताना पॉवर 56.59 bhp आणि टॉर्क 82.1 Nm पर्यंत खाली येते. पेट्रोल मॉडेलसाठी 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सच्या पर्यायासह 5-स्पीड मॅन्युअल देखील उपलब्ध आहे. तर CNG प्रकारासाठी फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.


मायलेज 


कंपनीचा दावा आहे की, सीएनजी प्रकार 32.73 किमी/किलो सीएनजी मायलेज देण्यास सक्षम आहे. Maruti S-Presso पेट्रोल व्हेरियंटची किंमत 4.25 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी 6.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. बाजारात मारुती एस-प्रेसो रेनॉल्ट क्विड आणि टाटा पंच यांच्याशी स्पर्धा करते.


फीचर्स


मारुती सुझुकी S-Presso मध्ये Apple CarPlay, Android Auto, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो आणि कीलेस एंट्रीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी फीचर्स आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत, कार ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट, EBD-ABS आणि फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर सारख्या फीचर्ससह येते.


सणासुदीच्या काळात विक्रीत सुधारणा करत कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांच्या 1,03,912 युनिट्सची विक्री केली आहे. मारुतीच्या इतक्या प्रचंड विक्रीचे कारण म्हणजे कंपनीच्या नवीन गाड्या. नवीन बलेनो आणि सेलेरिओसह सुरुवात करून कंपनीने गेल्या काही महिन्यांत अल्टो आणि ब्रेझाचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहेत. नवीन डिझाइनमध्ये उपलब्ध असलेल्या या गाड्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच गेल्या महिन्यात 26 सप्टेंबर रोजी लॉन्च झालेल्या ग्रँड विटाराने काही दिवसांतच धमाका केला आहे. लॉन्च झाल्यानंतर एका आठवड्यात या एसयूव्हीच्या 4,800 युनिट्सची विक्री झाली आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI