Bajaj Platina 110 ES Disc On Toad Price: सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. अशातच अनेक लोक नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करतात. यातच जर तुम्हीही नवीन बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल आणि तीही मायलेज बाईक? तर आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण बजाज प्लॅटिना 110 (Bajaj Platina 110) या मायलेज बाईकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही बाईक तुम्ही अगदी कमी डाउन पेमेंटसह घरी आणू शकता. ही बाईक आपल्या सेगमेंटमधील पहिली बाईक आहे, जी ABS प्रणालीसह 110cc इंजिनसह येते.
बजाजची ही बाईक तुम्ही दोन प्रकारे खरेदी करू शकता. पहिला पर्याय रोख रकमेचा आहे. ज्यासाठी तुम्हाला 84 हजार रुपये मोजावले लागतील. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही ही बाईक लोनवर घेऊ शकता. लोनवर ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 8 हजार रुपये लागतील. लोनवर ही बाईक खरेदी करण्यासाठी ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, ही बाईक खरेदी करण्यासाठी बँकेकडून वार्षिक 9.7 टक्के व्याजदरासह 72,481 रुपये कर्ज घ्यावे लागेल.
कर्जाच्या रकमेसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, किमान डाउन पेमेंट म्हणून 8,000 रुपये जमा करावे लागतील. यानंतर तुम्ही ही बाईक तुमच्या घरी घेऊन जाऊ शकाल. कर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी दरमहा 2,329 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. यात हे सांगणे महत्वाचे आहे की, ही बाईक खरेदी करण्यासाठी लोन तुमचा बँकिंग आणि सिबिल स्कोअर, जर या दोन्हीचा अहवाल नकारात्मक आला, तर बँक त्यानुसार कर्जाची रक्कम, डाउन पेमेंट आणि व्याजदर बदलू शकते.
किंमत आणि इंजिन
डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट व्हेरिएंट हे या बाईकचे टॉप मॉडेल आहे. जे 69,216 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. याची ऑन-रोड किंमत 83,667 रुपये आहे. या बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 115.45 cc सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन आहे. जे इंजिन 8.6 PS पॉवर आणि 9.81 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याला 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. या बाईकमध्ये बजाजने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. ज्यात सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. ARAI ने प्रमाणित केलेल्या मायलेजनुसार ही बाइक 1 लिटर पेट्रोलवर 80 किमी मायलेज देण्यास सक्षम आहे.
इतर महत्वाची बातमी:
Diwali 2022: यंदाची दिवाळी होणार धमाकेदार, स्वस्तात आणा घरी कार; जाणून घ्या काय आहे ऑफर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI