Maruti Suzuki Offer : मारूतीच्या सर्व कार ग्राहकांच्या प्रचंड पसंतीस येतात. यासाठीच मारूती (Maruti Suzuki) कंपनी आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी काही अपडेट्स घेऊन येतात, काही ऑफर्स देतात. नुकतीच मारुती एरिना डीलर्सनी या महिन्यात आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणल्या आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना मारुती सुझुकीच्या वाहनांवर बंपर कॅश डिस्काउंट देण्यात येतंय. याशिवाय मारुती अरेनाच्या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस आणि इतर अनेक फायदेसुद्धा दिले जातायत. 


मारुती सुझुकीच्या ज्या गाड्यांवर या महिन्यात ऑफर उपलब्ध आहेत, त्यापैकी अनेक गाड्या भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. Alto K10, S-Presso, WagonR, Celerio, Swift यांसारख्या वाहनांवर सवलती उपलब्ध आहेत ज्या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. पण, एक गोष्ट लक्षात घ्या की या ऑफर्स फक्त मार्च महिन्यासाठीच उपलब्ध आहेत.


मारुती अल्टो K10 (Maruti Alto K10)


कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी Alto K10 वर 62 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. तर त्याच्या मॅन्युअल व्हर्जनवर 57 हजार रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. मारुती सुझुकी सीएनजीवर ग्राहक 40 हजार रुपयांपर्यंतचे फायदे घेऊ शकतात, जे केवळ मॅन्युअल स्वरूपात उपलब्ध आहे. या कारची किंमत 3.99 लाख ते 5.96 लाख रुपये आहे.


मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso)


Maruti Suzuki S-Presso वर 61 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. मॅन्युअल मॉडेलवर 56 हजार रुपयांपर्यंत आणि सीएनजी मॉडेलवर 39 हजार रुपयांपर्यंत सूट आहे. Maruti Suzuki S-Presso ची किंमत 4.27 लाख ते 6.12 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.


मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) 


Maruti Suzuki Celerio AMT वर 61 हजार रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. त्याच्या मॅन्युअल व्हर्जनवर 56 हजार रुपयांपर्यंत आणि सीएनजी मॉडेलवर 39 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Celerio ची किंमत 5.37 लाख ते 7.10 लाख रुपये आहे.


मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)


मार्चमध्ये तुम्ही Maruti Suzuki WagonR वर 61 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. त्याच्या मॅन्युअल मॉडेलवर 56 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. सीएनजी मॉडेलवर 36 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्हाला देखीन नवीन कार विकत घ्यायची असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


New Arriving 7-Seater SUVs : भारतात तीन नवीन 7-सीटर SUV ची होणार एन्ट्री; महिंद्रा XUV700 आणि सफारीला देणार जबरदस्त टक्कर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI