Maruti Suzuki Invicto vs Toyota Innova Hycross vs Mahindra XUV700 : गेल्या काही वर्षांत प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये बऱ्याच मोठ्या हालचाली झाल्या आहेत.  त्यामुळे एकामागून एक अनेक नवीन एसयूव्ही लॉन्च झालेल्या पाहायला मिळतायत. यामुळे ग्राहकांना नवीन कार विकत घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. प्रीमियम SUV सेगमेंटची सुरुवात महिंद्राच्या XUV700 या कारपासून झाली. या कारला अनेक नवीन वैशिष्ट्यांसह एक नवीन पॉवरट्रेन मिळाली. या मागोमाग टोयोटाने आपली नवीन इनोव्हा हायक्रॉस पूर्णपणे नवीन रूपात सादर केली. या कारमध्ये निर्मात्यांनी आरामदायी वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केले आणि आता मारुती देखील या स्पर्धेत सहभागी झाली आहे.  या ठिकाणी आपण या तिघांची तुलना करणार आहोत, जेणेकरून जर तुम्ही यापैकी कोणती कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एक चांगला पर्याय निवडू शकता.


कोणती कार सर्वात मोठी?


तिन्ही वाहनांच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, इनोव्हा हायक्रॉस आणि इनव्हिक्टो 4755 मिमी लांबीसह समान लांबीच्या आहेत. तर XUV700 4695 मिमी लांबीसह किंचित लहान आहे. रुंदीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, इनोव्हा/इनव्हिक्टो 1890 मिमी आणि XUV700 1850 मिमी आहे. या कारचे व्हीलबेस XUV700 मध्ये 2750 मिमी आणि इनोव्हा हायक्रॉस/इनव्हिक्टोमध्ये 2850 मिमी आहे.


कोणत्या कारमध्ये सर्वाधिक फिचर्स आहेत? 


तिन्ही वाहनांना ड्युअल-झोन एसी, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, एक मोठा पॅनोरॅमिक सनरूफ आणि इतर अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. Invicto/Innova ला कॅप्टन सीट पर्याय, एक पॅनोरॅमिक सनरूफ आणि सनशेडसह कपहोल्डर आणि कारच्या मागील बाजूस पर्सनल कप होल्डर आहेत. तसेच कारच्या मागील सीट एडजस्टेबल आहे. इनोव्हा/इन्व्हिक्टोला पॉवर चालणारी ड्रायव्हर सीट आणि कूल्ड सीट तसेच इतर अनेक फिचर्स मिळतात. इनोव्हामध्ये एक्सटेंडेबल फूटरेस्ट देखील उपलब्ध आहे. तर, XUV700 मध्ये पॉप-आउट डोअर हँडल, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, 12-स्पीकर ऑडिओ सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. इनोव्हा आणि XUV700 या दोन्हींमध्ये सुरक्षा वैशिष्ट्य म्हणून ADAS आहे, परंतु हा पर्याय तुम्हाला Invicto मध्ये मिळणार नाही. 


कोणती कार सर्वात पॉवरफुल?


XUV700 मॅन्युअल/ऑटोमॅटिक प्लस ऑल व्हील ड्राईव्हसह 2.0L टर्बो पेट्रोल 200bhp पॉवर आणि 2.2L डिझेल 185bhp पॉवर उत्पादनांसह उपलब्ध आहे. तर, Innova Hycross/Invicto, 180bhp स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन आणि eCVT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. इनोव्हा हायक्रॉसला 2.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.


किंमतीच्या बाबतीत कोणती कार चांगली?


कारच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास,  XUV700 ची किंमत 14-26 लाख रुपये आहे, तर Innova Highcross ची किंमत 18.8 लाख ते 30 लाख रुपयांपर्यंत आहे. जर Invicto च्या किंमतीचा विचार केला तर Hycross पेक्षा कमी किंमत आहे. या कारची किंमत 24.7 लाख ते 28.4 लाखांपर्यंत आहे. XUV700 हे डिझेल इंजिन आणि अधिक पॉवरफुल पेट्रोलसह उपलब्ध आहे. XUV700 चा लूकही फार आकर्षक आहे. तसेच, या कारमध्ये ऑल व्हील ड्राईव्हसह ऑफ-रोड क्षमतेवर भर देण्यात आला आहे. तर, इन्व्हिक्टो आणि इनोव्हा हायक्रॉसमध्ये आरामदायी सुविधा, मायलेज आणि स्पेसवर अधिक भर देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Car : Tata Punch ला टक्कर द्यायला लवकरच येतेय 'Hyundai Exter'; किंमत माहितीये?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI