Maruti Fronx vs Tata Punch: Maruti Suzuki ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपली Fronx SUV सादर केली आणि लवकरच याची किंमती देखील जाहीर केली जाऊ शकते. ही कार कंपनीच्या लाइनअपमध्ये Brezza अंतर्गत येईल. स्पोर्टी डिझाइनसह ही एक मिनी एसयूव्ही असेल. फ्रँक्स हे मारुती सुझुकीचे प्रीमियम उत्पादन आहे आणि ते टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. यातच आज आपण टाटा पंच (Tata Punch) या देशातील लोकप्रिय मिनी SUV सोबत फ्रँक्सची तुलना करून जाणून घेणार आहोत की, कोणती कार बेस्ट आहे...
Maruti Fronx vs Tata Punch : पॉवरट्रेन
टाटा पंच (Tata Punch) 1.2 एल पेट्रोल इंजिनसह येतो, जे 86bhp पॉवर जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. दुसरीकडे फ्रँक्सला अधिक शक्तिशाली 1.2 L टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. जे 100bhp पॉवर जनरेट करते. याव्यतिरिक्त 1.2 L मानक पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील आहे, जो 90bhp पॉवर जनरेट करतो. यात मॅन्युअल आणि एएमटी ऑटोमॅटिकचा पर्याय मिळतो, तर टर्बो पेट्रोल इंजिनला 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.
Maruti Fronx vs Tata Punch : Maruti Fronx फीचर्स
Maruti Frons मध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह हेड अप डिस्प्ले, वायरलेस Apple कार प्लेसह 9-इंच HD Smart Play Pro+ इंफोटेनमेंट सिस्टम आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, 360 व्ह्यू कॅमेरा, वायरलेस चार्जर, Arkamys ऑडिओ सिस्टम यांसारखी फीचर्स मिळतात.
Maruti Fronx vs Tata Punch : Punch फीचर्स
तर पंचमध्ये (Tata Punch) स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा डिस्प्ले आहे. टचस्क्रीन, मागील कॅमेरा, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम, कनेक्टेड कार टेक, क्लायमेट कंट्रोल यासह इतर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.
Maruti Fronx vs Tata Punch : किंमत
टाटा पंचची (Tata Punch) एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 9.4 लाख रुपयांपर्यंत जाते. फ्रँक्सची (Maruti Fronx) अंदाजे किंमत 7 लाख ते 10 लाख रुपये असू शकते. पंच SUV ही जबरदस्त डिझाइन आणि अधिक हेडरूम असलेली एक उत्तम मायक्रो SUV आहे. तर Frons ही चांगल्या परफॉर्मन्ससह एक स्मूथ एसयूव्ही आहे.
इतर महत्वाची बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI