Maruti Suzuki Brezza Features : प्रसिद्ध वाहन उत्पादक निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या SUV ब्रेझाच्या टेक्नॉलॉजी आणि वैशिष्ट्यांमध्ये काही बदल केले आहेत. सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीला आता सर्व प्रवाशांसाठी सीट-बेल्ट रिमाइंडर मिळणार आहे. आधी फक्त पुढच्या सीटसाठी ही सुविधा उपलब्ध होती. आणखी कोणते बदल केले आहेत ते जाणून घेऊयात.


माईल्ड हायब्रिड प्रणालीमध्ये काढले 


वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, मारुतीने या कारच्या 1.5L पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटमधून लाईट हायब्रिड टेक्नॉलॉजी देखील काढून टाकले आहे, ज्यामुळे तिचे मायलेज 2.77kmpl वर आले आहे. आता 17.38kmpl मायलेज मिळण्याचा दावा केला जात आहे. ब्रेझा ऑटोमॅटिक 20.15kmpl मायलेज देते. या एसयूव्हीच्या सीएनजी प्रकारात फॅक्टरी-फिट सीएनजी किटसह 1.5L पेट्रोल मोटर इंजिन मिळते. CNG वर, ही कार जास्तीत जास्त 87.8bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.


किंमतीत बदल नाही


अनेक फीचर्स कमी केल्यानंतरही कंपनीने या एसयूव्हीच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. मारुती ब्रेझा सध्या 8.29 लाख ते 13.98 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. तर त्याच्या CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9.24 लाख ते 12.15 लाख रुपये आहे.


कंपनी पोर्टफोलिओचा विस्तार करतेय


मारुती आपला वाहन पोर्टफोलिओ सतत वाढवत आहे. कंपनीने या वर्षी तीन नवीन मॉडेल्स लाँच केले आहेत, ज्यामध्ये फ्रंक्स कॉम्पॅक्ट क्रॉसओवर, 5-डोअर जिमनी आणि इनव्हिक्टो प्रीमियम स्ट्रॉंग हायब्रिड एमपीव्ही यांचा समावेश आहे. 


कोणत्या कारशी स्पर्धा करणार 


मारुती सुझुकी ब्रेझा टाटा नेक्सॉनशी स्पर्धा करते. जी 1.2L पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन पर्यायासह ऑफर केली जाते.


महत्त्वाच्या बातम्या :


Goa EV : गोव्यात जाण्याचा प्लॅन करताय तर हे वाचा... आता ईव्ही कार आणि बाईक टूरिस्ट वाहन अनिवार्य; इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा निर्णय


Car loan Information:

Calculate Car Loan EMI