Mahindra Scorpio N vs Classic : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, महिंद्राने आपली नवीन Scorpio N भारतात लॉन्च केली होती. आणि नुकतंच कंपनीने जुन्या स्कॉर्पिओला नवीन लूक देत स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) या नवीन व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. या दोन्ही एसयूव्हींची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे. जर तुम्हालाही स्कॉर्पिओ घ्यायची असेल पण दोघांपैकी कोणती गाडी घ्यायची यामध्ये जर तुमचा गोंधळ होत असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. या ठिकाणी Scorpio N आणि Scorpio Classic या दोन्ही कारची तुलना केली आहे. जाणून घ्या कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट आहे. 


Scorpio Classic vs ScorpioN कोणती कार सर्वात मोठी? 


नवीन Mahindra Scorpio Classic 2022 ची उंची 1,995 mm आहे, तर लांबी 4,456 mm आहे. तेच स्कॉर्पिओ-एन ची उंची 1,857 मिमी आहे. तर, लांबी 4,662 मिमी आहे. रूंदीच्या दृष्टीने पाहिल्यास, Mahindra Scorpio Classic ची रूंदी 1,820 mm आणि 2,680 mm चा व्हीलबेस आहे. याला 17-इंचाचा रिम मिळतो. तर, ScorpioN ची रूंदी 1,917 मिमी, आणि 2,750 मिमी चा व्हीलबेस आहे. या SUV मध्ये 18-इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.




Scorpio Classic vs ScorpioN किंमत किती? 
 
या दोन्ही SUV ची एक्स-शोरूम किंमत समान आहे. Scorpio Classic फक्त दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर करण्यात आली आहे. त्याचे बेस मॉडेल (S) 11.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच वेळी, त्याच्या टॉप मॉडेलची (S11) किंमत 15.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Scorpio-N ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे, तर त्याचा टॉप व्हेरिएंट Rs 23.90 लाख (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच, दोन्ही कारच्या टॉप व्हेरियंटच्या किमतींमध्ये खूप फरक आहे. 


Scorpio Classic vs ScorpioN फिचर्स : 


स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये खूप कमी फिचर्स देण्यात आले आहेत. यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, टीपीएमएस यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याचा टचस्क्रीन डिस्प्ले स्कॉर्पिओ एन पेक्षा एक पाऊल पुढे आहे. तर, Mahindra Scorpio-N मध्ये 12-स्पीकर सोनी 3D सराउंड साउंड सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, AdrenoX इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, शॉक शोषक यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. 


Scorpio Classic vs ScorpioN इंजिन : 


Scorpio Classic मध्ये 2.2L mHawk टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे जे 130 hp पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते. यात मागील 2WD चा एकमेव पर्याय आहे जो 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देण्यात आला आहे. Mahindra Scorpio-N 2.0L mStallion टर्बो-पेट्रोलच्या ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे जे 172 hp पॉवर आणि 400 Nm टॉर्क निर्माण करते आणि 2.2L mHawk टर्बो-डिझेल 200 hp पॉवर आणि 380 Nm पीक टॉर्क निर्माण करते. पर्याय दिलेला आहे. ही SUV 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या ऑप्शनमध्ये येते.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI