Lexus UX 300e Electric SUV: प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी लेक्सस आपली नवीन UX 300e Electric SUV लॉन्च करण्याची तयारी करत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहक या कारची वाट पाहत आहेत. या कारसह कंपनी नजीकच्या काळात इलेक्ट्रिक कार किंवा हायब्रीड कार लॉन्च करण्याचा विचार करत आहे. अलीकडेच कंपनीने NX हायब्रीड मिडसाईज लक्झरी SUV लाँच केली होती. अशातच कंपनी आता 100 टक्के इलेक्ट्रिक असलेली UX 300e लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
ही कार 204hp जनरेट करेल, जी एका चार्जमध्ये 400 किमीचा पल्ला गाठेल, असा दावा कंपनीने केला आहे. ही कार भारतात लॉन्च केली जाणार नाही. मात्र अनेक ग्राहकांची अपेक्षा आहे की, ही कार भारतात लॉन्च व्हावी. ही कार आपल्या वेगळ्या लूकमुळे ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. या कारचा पुढील भाग लांब आणि आकर्षक आहे. ही कार आकाराने लहान जरी असली तरी दिसायला चांगली आहे. कंपनीने यामध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत, ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
ही इलेक्ट्रिक कार हिच्या ड्रायव्हिंगच्या अनुभवासाठी ओळखली जाणार आहे. कारण ही कार फास्ट पण आरामदायी आहे. कंपनीने हिला चांगल्या प्रकारे ट्यून केलं आहे. यात इको आणि स्पोर्ट ड्रायव्हिंग मोड देण्यात आले. शहरात तुम्ही ही कार सहज इको मोडवर चालवू शकता. तर जलद गतीने कार चालवण्यासाठी तुम्ही याच्या स्पोर्ट मोडचा वापर करू शकतात. ही कार स्पोर्ट मोडमध्ये 300 किमीची रेंज देऊ शकते, तर इको मोडमध्ये 400 किमीची रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. खराब रस्त्यांवर ही गाडी चालवताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Lexus UX 300e फक्त 7.5 सेकंदात 100km/ताशी वेग पकडते. यात 54.4 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. 50 kW प्लगद्वारे ही कार एक तासापेक्षा कमी वेळात चार्ज केली जाऊ शकते. 300e मध्ये एलईडी हेडलाइट्स, ऑल राउंडर पार्किंग सेन्सर्स आणि रिव्हर्सिंग कॅमेरा, Apple CarPlay आणि Android Auto सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय कीलेस एंट्री, एक वायरलेस फोन चार्जर सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहे. यात ग्राहकांना एक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, एक मोठी एनएव्ही स्क्रीन देखील मिळते.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI