Range Rover Velar Facelift : लँड रोव्हरने जुलै 2023 मध्ये अपडेटेड रेंज रोव्हर वेलार (Range Rover Velar) लाँच केली होती. या कारची एक्स शोरूम किंमत 93 लाख रुपयांपासून सुरु होते. डिसेंबरमध्ये या कारची किंमत 1.3 लाख रुपयांनी वाढली होती आणि आता कंपनीने ती 6.4 लाख रुपयांनी या कारची किंमत स्वस्त केली आहे. सध्या कंपनीच्या या प्रीमियम एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 87.9 लाख रुपये झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


रेंज रोव्हर वेलार फेसलिफ्टची वैशिष्ट्ये


रेंज रोव्हर वेलार फेसलिफ्टच्या इंटर्नल आणि एक्सटर्नल भागात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. डिझाईनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीमध्ये स्लीक पिक्सेल एलईडी हेडलॅम्प आणि डायनॅमिक बेंड लायटिंग आहे. यात ब्लॅक थीमसह अपडेटेड फ्रंट ग्रिल देखील आहे. मागील बाजूस लाईट बदल करण्यात आले आहेत. हे नवीन स्कफ प्लेट्ससह पुन्हा डिझाईन केलेले बंपर मिळते. एसयूव्हीच्या बाजू आणि सिल्हूट समान राहतील आणि नवीन वेलार मेटॅलिक व्हेरेसिन ब्लू आणि प्रीमियम मेटॅलिक जडर ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.


वेलार फेसलिफ्ट इंटीरियर 


इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, वेलारला आता JLR च्या Pivi Pro UI सह 11.4-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. अपडेटेड वेलारला हवामान आणि ऑडिओ नियंत्रणे आणि Amazon Alexa व्हॉईस कंट्रोल कार्यक्षमतेसह नवीन 'प्री-ड्राईव्ह' पॅनेल देखील मिळते. स्टीयरिंग व्हील, एअर व्हेंट्स आणि सेंटर कन्सोलला आता मूनलाईट क्रोम ॲक्सेंट मिळतात.


2023 वेलारमध्ये यापुढे हवामान नियंत्रणासाठी वेगळी टचस्क्रीन असणार नाही. यात लपवलेले स्टोरेज क्यूबी आणि खाली वायरलेस फोन चार्जरसह नवीन सेंटर कन्सोल मिळतो. लँड रोव्हरचा दावा आहे की सुमारे 80 टक्के फंक्शन्स इन्फोटेनमेंट स्क्रीनवर फक्त दोन टॅपने करता येतात. इतर वैशिष्ट्यांमध्ये वायरलेस Apple CarPlay/Android Auto, वायरलेस चार्जर आणि PM 2.5 एअर फिल्टर यांचा समावेश आहे.


वेलार फेसलिफ्ट इंजिन 


नवीन वेलार डायनॅमिक दोन इंजिन पर्यायांसह HSE मध्ये उपलब्ध असेल. यात 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 246 hp पॉवर आणि 365 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन 2.0-लिटर इंजेनियम टर्बो डिझेल इंजिन आहे, जे 201 hp पॉवर आणि 420 Nm टॉर्क जनरेट करते. SUV ला इको, कम्फर्ट, ग्रास-ग्रेव्हल-स्नो, मड-रट्स, सँड, डायनॅमिक आणि ऑटोमॅटिक मोड्ससह लँड रोव्हरची टेरेन रिस्पॉन्स 2 सिस्टीम मिळते.


महत्त्वाच्या बातम्या :


भन्नाट फिचर्ससह Realme 12+ 5G स्मार्टफोन भारतात 6 मार्चला होणार लॉन्च; किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या


Car loan Information:

Calculate Car Loan EMI