2022 Range Rover: लँड रोव्हरची (Land Rove) भारतातील ऑटोमोबाईल बाजारपेठेत स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ही कंपनी आपल्या आलिशान कारसाठी ओळखली जाते. कंपनीने आपल्या रेंज रोव्हर एसयूव्हीच्या 2022 मॉडेलची देशात डिलिव्हरी सुरू केली आहे. यावेळी त्याच्या मॉडेलमध्ये 3 लीटर पेट्रोल इंजिनच्या नवीन प्रकारालाही स्थान देण्यात आले आहे. यासह आता एकूण प्रकारांची संख्या 3 झाली आहे. ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 2.39 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ते 3.51 कोटी रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.


इंजिन आणि पॉवर 


नवीन रेंज रोव्हर देशात तीन इंजिन पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. पहिले 4.4 लिटर ट्विन टर्बो इंजिन, दुसरे 3.0 लिटर 6 सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि तिसरे 3.0 लिटर 6 सिलेंडर डिझेल इंजिन पर्याय आहे. यात 3.0-लिटर 6-सिलेंडर डिझेल इंजिन आहे. जे 346bhp पॉवर आणि 700 Nm टॉर्क जनरेट करते. 3.0-लिटर 6-सिलेंडर पेट्रोल इंजिन 550 Nm पीक टॉर्कसह 394 Bhp पॉवर आणि तिसरे 4.4-लिटर ट्विन टर्बो इंजिन 523 Bhp पॉवर आणि 750 Nm पीक टॉर्क निर्माण करते.


डिझाइनच्या दृष्टीने नवीन रेंज रोव्हर मजबूत आणि अतिशय स्टाइलिश आहे. ही कंपनीच्या एमएलए-फ्लेक्स बॉडी आर्किटेक्चरवर आधारित आहे. ज्यामध्ये स्पेस देखील चांगले मिळते. या प्लॅटफॉर्मवर तयार केलेली कार सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. यात मागील एलईडी ब्रेक लाईटसह, नवीन बंपर आणि टेललाइटवरील कॉपर अ‍ॅक्सेंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 2022 रेंज रोव्हर व्हीलबेससाठी दोन पर्याय आहेत. ज्यामध्ये पहिला पर्याय स्टँडर्ड  व्हीलबेस (SWB) आणि दुसरा लांब व्हीलबेस (LWB) आहे. जर आपण सीटिंगचा पर्याय पाहिला तर याच्या स्टँडर्ड व्हीलबेसमध्ये चार किंवा पाच सीट आणि तिसर्‍या रांगेत 7 सीटर पर्यायासह लांब व्हीलबेसमध्ये चार ते पाच सीट्सचा पर्याय आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI