मुंबई : कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड (केइएल) ने संपूर्ण नवीन कायनेटिक डीएक्स इव्हीच्या लॉन्चसह दुचाकी बाजारात आपल्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. ही नवीन मेड-इन-इंडिया मॉडेल श्रेणी कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लि. (केडब्ल्यूव्ही) या त्यांच्या इव्ही उत्पादनास समर्पित कंपनीद्वारे तयार करण्यात आली आहे.
नाविन्यपूर्णता, व्यावहारिकता आणि उत्कृष्ट रूप असलेली, अनेक पिढ्यांनी वाखाणलेली डीएक्स आता एका प्रगत इलेक्ट्रिक स्कूटरच्या रूपात पुनरागमन करत आहे, ज्यामध्ये त्यांचे लोकप्रिय डिझाईन आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा सुमेळ साधण्यात आला आहे, जे डीएक्सच्या वृत्तीस अनुरूप आहे. या स्कूटरचा मूळ डीएनए अबाधित ठेवण्यासाठी इटालियन डिझाईर्सच्या सोबतीने आकर्षक डिझाईन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हे एक खरेखुरे कौटुंबिक वाहन बनले आहे.
मजबूत मेटल बॉडी आणि ऐसपैस फ्लोरबोर्ड सह या नवीन कायनेटिक डीएक्स इव्हीने आपल्या मूळ डिझाईनशी इमान राखले आहे. या विभागात सीटखालील सर्वात मोठे 37+लीटरचे स्टोरेज यात आहे, ज्यामध्ये एक संपूर्ण आणि एक अर्धे हेल्मेट तसेच खालील बाजूस असलेल्या छोट्या छोट्या खणांमुळे काही दैनंदिन उपयोगाच्या वस्तू देखील राहू शकतात. यातील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे रेंज-एक्सने बनवलेली 2.6 केडब्ल्यूएच महत्तम क्षमतेची एलएफपी बॅटरी, जिचे जीवनमान भारतातील इतर एनएमसी बॅटरी-संचालित स्कूटर्सच्या तुलनेत 4 पटींपर्यंत जास्त आहे. त्यामुळे अधिक चांगल्या थर्मल संवेदनशीलतेसह हा अधिक सुरक्षित पर्याय आहे. ही बॅटरी डीएक्स+ वर 116किमी ची आयडीसी रेंज देईल, असे अनुमान आहे, कारण यात महत्तम कार्यक्षमतेसाठी के-कोस्ट रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि एक 60 व्हीची सिस्टम आहे. यामध्ये एक दमदार मोटर देखील आहे, जी 3 मोड्स (रेंज, पॉवर, टर्बो) सह ताशी 90 किमी वेगापर्यंतची गती देण्यास सक्षम आहे.
कायनेटिक डीएक्स आणि डीएक्स+ या दोन्ही मॉडेल्समध्ये रिव्हर्स आणि हिल होल्ड फीचर्स आहेत. फ्रंट टेलिस्कोपिक आणि समयोजित करण्याजोग्या रियर शॉक अब्जॉर्बर्स द्वारा या गाडीला आरामदायकता बहाल करण्यात आली आहे तर कॉम्बी ब्रेकिंगसह 220 मिमी फ्रंट डिस्क आणि 130 मिमी रियर ड्रम ब्रेक द्वारे सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
डीएक्स इव्हीच्या मागील व्हिजनविषयी बोलताना कायनेटिक इंडियाचे उपाध्यक्ष अजिंक्य फिरोदिया म्हणाले, 90 च्या दशकात कायनेटिक डीएक्सने इतक्या नवीन गोष्टी दिल्या होत्या. त्या गाडीने लक्षावधी लोकांच्या मनात कायमी स्थान मिळवले. ह्या प्रसिद्ध गाडीचे पुनरुज्जीवन करताना आम्ही केवळ एक स्कूटर लॉन्च केलेली नाही, तर ती विश्वासार्हता, नावीन्यपूर्णता आणि मजबुती देखील पुन्हा सादर केली आहे, जी पूर्वीपासून कायनेटिकची ओळख आहे. मात्र यावेळी त्यात एक भविष्य-उन्मुख चैतन्य आहे. नवीन डीएक्सच्या माध्यमातून आम्ही अनेक सेगमेन्ट-फर्स्ट फीचर्स दाखल केली आहेत आणि आम्हाला खात्री आहे की, ही फीचर्स इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नवीन युगात या गाडीला लोकप्रिय बनवतील. कायनेटिकसाठी आणि भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या उत्क्रांतीत ही एका धाडसी नव्या अध्यायाची सुरुवात आहे.
कायनेटिक डीएक्स इव्ही रेंजसोबत एक समर्पित मोबाइल अॅप येते तर डीएक्स+ हे व्हेरियन्ट प्रगत टेलीकायनेटिक फीचर्ससह चालकाचा अनुभव अधिक उन्नत करते. या फीचर्समध्ये रियल-टाइम राईडची आकडेवारी आणि वाहनाचा डेटा, जिओ फेन्सिंग, इंट्रूडर अलर्ट, फाइंड माय कायनेटिक, ट्रॅक माय कायनेटिक आणि इतर अनेक फीचर्सचा समावेश आहे. माय कायनी कम्पॅनियन व्हॉईस अलर्ट्स सह या स्कूटरला एक व्यक्तिमत्व बहाल करण्यात आले आहे. ज्यामध्ये ही स्कूटर चालकाला भेटते, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सुरक्षितता आणि स्कूटरच्या कार्यांबाबत जागरूक देखील करते. या दोन्ही व्हेरियन्टमध्ये ब्लूटुथ मार्फत तत्काळ सीआरएम कनेक्टसाठी एक समर्पित कायनेटिक असिस्ट स्विच आहे. इतर ब्लूटुथ सक्षम फीचर्समध्ये बिल्ट-इन स्पीकर सह म्युझिक आणि व्हॉईस नेव्हीगेशनचा समावेश आहे.
या गाडीचे बुकिंग 35000 गाड्यांपर्यंतच मर्यादित आहे आणि डिलिव्हरी येत्या सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. ग्राहक कायनेटिकइव्ही.इन या संकेतस्थळाला भेट देऊन 1000 रु. भरुन आपली डीएक्स बुक करू शकतात. कायनेटिक डीएक्सची किंमत 1 लाख 11 हजार 499 रु. आहे तर कायनेटिक डीएक्स+ ची किंमत 1 लाख 17 हजार 499 रु. आहे (सर्व किंमती एक्स-शोरूम, पुणे आहेत). डीएक्स+ पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे- लाल, निळा, सफेद, सिल्व्हर आणि काळा. डीएक्स व्हेरियन्ट सिल्व्हर आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या:
BMW Electric Scooter : BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात धमाका करणार, एका चार्जमध्ये 130 किमी, फास्ट चार्जिंगचीही सुविधा
Car loan Information:
Calculate Car Loan EMI