Kia EV9 Electric SUV : सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक वाहन कंपन्यादेखील इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या मार्गावर आहे. अशातच किआ कंपनीने Kia India आपली नवीन इलेक्ट्रिक SUV EV9 कार पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. कंपनीने कॉन्सेप्ट फॉर्मसह ऑटो एक्सपो 2023 मध्ये ही कार सादर केली. भारतीय बाजारात EV6 नंतर EV9 ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार असेल. या संदर्भात किआ इंडियाचे सीईओ ताई जिन पार्क म्हणाले, "पुढच्या वर्षी आम्ही ग्राहकांसाठी EV9 कार आणणार आहोत. Kia भारतातील तिच्या इलेक्ट्रिक वाहनांसह टॉप-डाउन धोरण आखू इच्छित आहे. EV9 ही Kia ची जागतिक स्तरावर सर्वात महागडी, सर्वात मोठी आणि लक्झरी इलेक्ट्रिक SUV असणार आहे.


Kia India ने Kia 2.0 नावाची नवीन ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रॅटेजीचा खुलासा केला आहे. यामध्ये, कंपनीने पुढील काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत 10% मार्केट शेअर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. Kia 2.0 धोरणाचा भाग म्हणून, Kia EV9 सारखे नवीन मॉडेल बाजारात आणणार आहे. देशामध्ये त्याचा व्हॉल्यूम आणि मार्केट शेअर आणखी वाढवण्यासाठी हे धोरण आखणार आहे. 


Kia EV9 बॅटरी, पॉवरट्रेन आणि रेंज कशी असेल? 


आंतरराष्ट्रीय स्तरावर EV9 वर तीन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत. याची सुरुवात EV9 RWD पासून होते. यामध्ये 76.1 kWh ची बॅटरी मिळते तसेच यामध्ये 160kw मोटार रीअर बसवली जाते. ही कार 215hp आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. Kia च्या मते EV9 मध्ये 358km रेंज आहे. Kia चा दुसरा पॉवरट्रेन पर्याय EV9 RWD लाँग रेंज आहे. यात 99.8 kWh बॅटरी आणि 150kw (201hp) मोटर मिळते. हे प्रकार WLTP सायकलनुसार 541Km ची रेंज ऑफर करते. टॉप स्पेक EV9 AWD ला दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळतात जे एकत्रित 283 kW (380hp आणि 600Nm टॉर्क) जनरेट करतात. 


Kia EV9 ची किंमत किती? 



परदेशातील इतर बाजारपेठांप्रमाणे EV9 ही भारतातील सर्वात महागडी कार असेल. Kia ने भारतीय मार्केटमध्ये EV9 ची किंमत 1 कोटी रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता सांगितली आहे.


Kia EV9 कोणाशी करणार स्पर्धा?


Kia EV9 ही कार काही बाजारपेठांमध्ये BMW iX ला टक्कर देणार आहे. EV9 व्यतिरिक्त, सर्व-नवीन कार्निवल MPV आणि Sonet फेसलिफ्ट पुढील वर्षी भारतात विक्रीसाठी जाण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Car Comparison : Maruti Suzuki Invicto, Toyota Innova Hycross की Mahindra XUV700; तुमच्यासाठी कोणती कार सर्वात भारी? वाचा सविस्तर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI