Upcoming Bikes In India 2022: हंगेरियन बाईक उत्पादक कंपनी Keeway भारतात आपल्या दोन नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 15 सप्टेंबर रोजी दोन नवीन बाईक लॉन्च करणार आहे. या दोन्ही बाईकबद्दल अद्याप अधिक माहित समोर आलेली नाही. मात्र कंपनीने आपल्या आगामी बाईकचा टीझर जारी केला आहे. या बाईकमध्ये ग्राहकांना आधुनिक फीचर्स पाहायला मिळू शकतात.


Keeway ने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या चार दुचाकी लॉन्च केल्या आहेत. ज्यात बाईकसह स्कूटरचा समावेश आहे. नवीन बाईक्स लॉन्च झाल्यानंतर कंपनीच्या एकूण मॉडेल्ससह बाजारात उपलब्ध होणार आहे. भारतात कंपनी बेनेली इंडियाच्या सहकार्याने आपली सर्व वाहने लॉन्च करत आहे.


या बाईकच्या टीझरनुसार, कंपनीच्या नेकेड स्ट्रीट फायटर बाईकला शार्प एलईडी हेडलाइट, गोल्डन USD फोर्क सस्पेंशन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, शार्प फ्युएल टँक डिझाइन आणि स्लिम बॅक डिझाइन देण्यात आले आहे. या बाईकमधील हेडलाइट आणि टर्न इंडिकेटर LED मध्ये दिलेले आहेत. ज्यामुळे LED मध्ये टेल लाईट देखील दिली जाऊ शकते.


किवेच्या आगामी फुल फेअरिंग बाईकबद्दल सांगायचे तर, याच्या फ्रंट फेअरिंगला एलईडी हेडलाइटसह ट्विन एलईडी डीआरएल देण्यात आले आहे. या बाईकमध्ये क्लिप-ऑन-हँडल बार देण्यात आल्याचे टीझरमध्ये दिसून आले आहे. या बाईकमध्येही डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट आणि एलईडी टर्न इंडिकेटर दिले जाऊ शकतात. या बाईकच्या समोर गोल्डन USD फोर्क्स देखील देण्यात आले आहेत. दोन्ही बाईकमध्ये समान क्षमतेची इंधन टाकी दिली जाऊ शकते. याशिवाय या दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक, एबीएस, अलॉय व्हील आणि टायरचा आकार दिला जाऊ शकतो. मात्र दोन्ही बाईकचे इंजिन डिटेल्स अजूनही समोर आलेले नाही.


याआधी किवेने भारतात दोन क्रूझर बाईक लॉन्च केल्या आहेत. यामध्ये Keeway  K-Lite 250V आणि V302C यांचा समावेश आहे. दोन्ही बाईक भारतात अनुक्रमे 3.09 लाख आणि 3.89 लाख (एक्स-शोरूम) च्या किमतीत उपलब्ध आहेत. Keeway K-Lite 250V मध्ये 250 cc V-ट्विन इंजिन आहे. जे 18.7 Bhp पॉवर आणि 19 Nm टॉर्क जनरेट करते. Keeway V302C मध्ये 298 cc V-ट्विन इंजिन आहे. जे 29.5 Bhp आणि 26.5 Nm टॉर्क जनरेट करते. आता स्ट्रीट फायटर आणि स्पोर्ट्स बाईक एकसारख्याच इंजिनसह लॉन्च होणार की दोन्हीमध्ये वेगवेगळे इंजिन असेल, हे लॉन्चच्या वेळीच समोर येईल.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI