Jeep Suv: अमेरिकन वाहन उत्पादक कंपनीने जीपने आपली नवीन एसयूव्ही Jeep Meridian भारतीय बाजारात सादर केली आहे. ही एक 7 सीटर एसयूव्ही आहे. ज्यात तीन सीट्सच्या रांगा आहेत. ही एसयूव्ही 'जीप कंपास'चाच एक लोंगर व्हर्जन आहे. कंपनी आपली ही कार मे किंवा जून महिन्यात लॉन्च करू शकते. या कारची डिलिव्हरी जूनपासून सुरू होऊ शकते. कंपनीची ही दुसरी कार आहे, जी भारतात लॉन्च होणार आहे. या आधीने आपली कंपास एसयूव्ही भारतात लॉन्च केली होती. त्यावेळी कंपनीने ही कार 30.72 लाख रुपयांमध्ये लॉन्च केली होती. ज्याला भारतीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये कंपास एसयूव्हीला जीप कमांडर म्हणून ओळखली जाते.  


बुकिंग कधी होणार सुरू? 


कंपनी मे महिन्यात या कारचे बुकिंग सुरू करू शकते. लॉन्च झाल्यानंतर ही कार टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टरला टक्कर देईल. ही जीप कार अनेक चांगल्या फीचर्ससह लॉन्च करण्यात येणार असून ही पूर्ण आकाराची एसयूव्ही कार असेल.


फीचर्स


या SUV मध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत, ज्यात इंटिग्रेटेड LED DRL सह नवीन ऑल-एलईडी हेडलॅम्प, नवीन अलॉय व्हील आणि नवीन बंपरचा समावेश आहे. एसयूव्हीमध्ये 60 हून अधिक सेफ्टी फीचर्स दिले आहेत. ज्यामध्ये 6 एअर बॅक आणि 360 डिग्री पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर सारख्या फीचर्सचा समावेश आहे. जीप कमांडरबद्दल बोलायचे झाले तर, त्याची लांबी 4,769 मिमी, रुंदी 1,859 मिमी, उंची 1,682 मिमी आणि व्हीलबेस 2,794 मिमी आहे.


इंजिन 


कंपनीने यात 2.0 लिटरचे चार सिलेंडर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असेल. याची टॉप स्पीड 198 किमी प्रतितास असून ही कार फक्त 10.8 सेकंदात 100 kmph चा वेग पकडते.


महाराष्ट्रात होणार उत्पादन 


स्टेलेंटिस इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक रोलँड बुचारा म्हणाले की, या कारचे उत्पादन कंपनीच्या महाराष्ट्रातील रांजणगाव प्लांटमध्ये केले जात आहे. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी रँग्लर आणि कंपाससह पाच उत्पादनांच्या विकासासाठी 250 मिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI