Jeep Compass: जीपने भारतीय बाजारपेठेत कंपास एसयूव्हीचा खास 'नाईट ईगल' एडिशन व्हेरिएंट लॉन्च केला आहे. नवीन ट्रिममध्ये ब्लॅक थीम कंपनीने दिली आहे. याशिवाय जीपने कंपासच्या किंमतीत 25,000 रुपयांची वाढ केली आहे. कंपनीच्या या नवीन कारमध्ये काय आहे खास, तसेच याची किंमत आणि फीचर्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
कंपनीच्या या नाईट ईगल एडिशनची किंमत डिझेल व्हेरियंटसाठी 21.95 लाख रुपये आणि पेट्रोल व्हेरियंटसाठी 22.75 लाख रुपये आहे. तसेच जीप कंपासची किंमत आता 18.04 लाख ते 29.59 लाख रुपये आहे. असे असेल तरी कंपास ट्रेलहॉकच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि त्याची विक्री 30.97 लाख रुपये (सर्व किंमती, एक्स-शोरूम) सुरू राहील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
जीप नाइट ईगल एडिशनच्या बाहेरील बाजूस सर्व ब्लॅक पेंट स्कीम आहे. ज्यात पुढील लोखंडी जाळी, ग्रिल रिंग, 18-इंच अलॉय व्हील, रूफ रेल, विंग मिरर, तसेच फॉग लॅम्प बेझल्सचा समावेश आहे. ऑल-ब्लॅक थीम केबिनमध्ये देखील ठेवली गेली आहे. केबिन हायलाइट्समध्ये पियानो-ब्लॅक डॅशबोर्ड, लाइट टंगस्टन स्टिचिंगसह ब्लॅक सीट्स, तसेच दरवाजाच्या ट्रिमसाठी ब्लॅक विनाइल इन्सर्ट समाविष्ट आहेत.
व्हेरिएंट आणि किंमत
जीप कंपास 2.0 मल्टीजेट डिझेल इंजिन स्पोर्ट 4x2 MT ची किंमत 19.74 लाख रुपये, Longitude (O) 4x2 MT ची किंमत 21.54 लाख रुपये, Night Eagle 4x2 MT ची किंमत 21.95 लाख रुपये, Limited (O) 4x2 MT ची किंमत 23.64 लाख रुपये, Limited (O) 4x4 AT ची किंमत 27.44 लाख रुपये आणि Model S 4x4 AT ची किंमत 29.59 लाख रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maruti Suzuki Car: आजपासून कार घेणं महाग; मारुतीच्या सर्व कार मॉडेल्सच्या किमतीत वाढ
- Top Safest Car: लहान-मोठ्यांसाठी असलेली 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या कार; पाहा यादी
- 'या' दिवशी लॉन्च होणार Mercedes-Benz ची नवीन सी-क्लास लक्झरी कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Car loan Information:
Calculate Car Loan EMI