Jaguar Launches I-Type 6 Electric Racing Car: जग्‍वार टीसीएस रेसिंगने आज आपली इलेक्ट्रिक रेसिंग कार आय-टाइप 6 लॉन्च केली आहे. ही कार 2023 एबीबी फिया फॉर्म्‍युला ई वर्ल्‍ड चॅम्पियशनशीपमध्‍ये स्‍पर्धा करण्‍यासाठी डिझाइन व निर्माण करण्‍यात आलेली आहे. जग्‍वार आय-टाइप 6 आतापर्यंतची सर्वात प्रगत व कार्यक्षम इलेक्ट्रिक जग्‍वार रेस कार आहे. ही फ्रण्‍ट व रिअर पॉवरट्रेन्‍स असलेली पहिली फिया फॉर्म्‍युला ई रेस कार आहे. याच्या पुढील बाजूस 250 केडब्‍ल्‍यू रिजेनची भर करण्‍यात आलेली आहे. मागील बाजूस 350 केडब्‍ल्‍यू रिजेनची भर करण्‍यात आली आहे. यामुळे जनरेशन 2 मॉडेलच्‍या तुलनेत रिजनरेटिव्‍ह क्षमता दुप्‍पट करण्‍यात आली आहे आणि रिअर ब्रेक्‍स काढण्‍यात आले आहेत.


जानेवारी 2023 मध्‍ये सुरू होणारे फॉर्म्‍युला ईचे जनरेशन 3 जगभरातील रस्‍त्यांवर गतीशील व अधिक उत्‍साहवर्धक व्‍हील-टू-व्‍हील रेसिंग घेऊन येत आहे. नवीन अत्‍याधुनिक तंत्रज्ञानांमध्‍ये अग्रणी असलेली जग्‍वारच्‍या फॉर्म्‍युला ई रेस कारची तिसरी पिढी नवीन कार्यक्षमता बेंचमार्क्‍स स्‍थापित करेल. यापूर्वीच्‍या कार्सच्‍या तुलनेत ही कार 74 किग्रॅ वजनाने हलकी असण्‍यासोबत 100 केडब्‍ल्‍यू अधिक शक्तिशाली आहे. या कारमध्‍ये प्रतितास 321 किमीची अधिकतम गती प्राप्‍त करण्‍याची क्षमता आहे.


कार संदर्भातील महत्वाच्या गोष्टी : 


नवीन जग्‍वार आय-टाइप 6 ही 2023 एबीबी फिया फॉर्म्‍युला ई वर्ल्‍ड चॅम्पियनशीप जिंकण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली आतापर्यंतची सर्वात प्रगत व कार्यक्षम इलेक्ट्रिक जग्‍वार रेस कार आहे.


वजनाने हलकी, अधिक शक्तिशाली व गतीशील जग्‍वार आय-टाइप 6 प्रतितास 200 मैलसह ऑल-इलेक्ट्रिक रेस कारसाठी नवीन कार्यक्षमता बेंचमार्क्‍स स्‍थापित करेल.


जग्‍वार आय-टाइप 6 मध्‍ये असलेले रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग इतके शक्तिशाली आहे की, त्‍यामध्‍ये समकालीन रिअर ब्रेक्‍स नाहीत.


जग्‍वार आय-टाइप 6 मधील तंत्रज्ञान 2025 पासून ऑल-इलेक्ट्रिक मॉडर्न लक्‍झरी ब्रॅण्‍ड म्‍हणून जग्‍वारच्‍या भवितव्‍याची पुनर्कल्‍पना करण्‍यामध्‍ये साह्य करेल.


Gen3 All-Electric Car 


दरम्यान, FIA ​​ने तिसऱ्या पिढीची Formula E कार याच वर्षी लॉन्च केली होती. ही कार FIA आणि Formula E ने संयुक्तपणे लॉन्च केली आहे. Formula E all-electric Gen3  322kph चा टॉप स्पीड देऊ शकते. ही कार 350kW पॉवर (470BHP) इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे. 


जग्‍वार टीसीएस रेसिंगने सर्वोच्‍च रेटिंग फिया थ्री-स्‍टार एन्‍व्‍हारोन्‍मेंटल अॅक्रेडिएशनसह सीझन 9 मध्‍ये प्रवेश करत आहे.


जग्‍वार टीसीएस रेसिंग 12 शहरांमधील 17 रेसेसपैकी प्रथम 14 जानेवारी 2023 रोजी मेक्सिको सिटीमध्‍ये रेस करेल. जग्‍वार टीसीएस रेसिंग 11 फेब्रुवारी 2023 रोजी भारतातील हैदराबादमध्‍ये रेस करेल. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI