Made in India EV Launch : वाहन उत्पादक कंपनी Kia ने भारतात आपल्या EV6 SUV च्या 200 डिलिव्हरी पूर्ण केल्या आहेत. जे कंपनीच्या लक्ष्यापेक्षा दुप्पट आहेत. Kia ने आपल्या पहिल्या वर्षात EV6 चे सुमारे 100 युनिट्स विकण्याची योजना आखली आहे. त्यासाठी जवळपास 355 बुकिंग प्राप्त झाले आहेत. जे पुढील वर्षी पूर्ण करण्याची आणि भारतात EV6 ची आणखी युनिट्स आयात करण्याची त्यांची योजना आहे. जास्त मागणीमुळे EV6 च्या सर्व आयात युनिट्सची विक्री झाली आहे. EV6 भारतात CBU मार्गाने आयात केली जाते.


किती मिळणार रेंज? 


या कारमध्ये 708 किमीची एआरएआय प्रमाणित रेंज मिळते. ही कार ट्विन मोटर लेआउटसह उपलब्ध आहे. CBU द्वारे येत असताना ड्युअल मोटर व्हर्जनसह EV6 ची किंमत 64.9 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर याच्या सिंगल मोटर कॉन्फिगरेशनची किंमत 54.9 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. इतकी महाग किंमत असूनही याला खरेदीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण म्हणजे यामध्ये देण्यात आलेले फीचर्स आणि याची रेंज हे आहे.


ही कार ई-जीएमपीवर बनवण्यात आली आहे 


Kia EV6 कंपनीने डेडिकेटेड इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर EV प्लॅटफॉर्मवर (E-GMP) तयार करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील कंपनीचे हे पहिले डेडिकेटेड SUV मॉडेल आहे. EV6 ही एक प्रीमियम SUV आहे. यातच कंपनी भारतातही इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार आहे. ज्यात कियाची पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार 2025 पर्यंत येईल. जी E-GMP प्लॅटफॉर्मवर भारतात बनवली जाईल. सध्या कंपनी याचे फास्ट चार्जिंग नेटवर्क वाढवत आहे आणि फास्ट चार्जिंग स्टेशन्स सेट करण्याचे काम करत आहे.


मेड इन इंडिया Pravaig Defy देते 500 किमी रेंज 


अलीकडेच  बेंगळुरू येथील स्टार्टअप Pravaig Dynamics ने  आपली पहिली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV Pravaig Defy देशात लॉन्च केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 39.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. ही इलेक्ट्रिक SUV पूर्ण चार्ज केल्यावर 504 किलोमीटरची रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान, देशातील प्रीमियम EV स्पेसमध्ये अनेक ब्रँड्ससह विविध किंमतीत बरेच पर्याय आहेत. अलीकडेच देशात मर्सिडीज EQB आणि Volvo XC40 रिचार्ज सारख्या कार लॉन्च झाल्या आहेत. कॉम्पॅक्ट स्पेसपेक्षा प्रीमियम सेगमेंटमध्ये अजूनही अधिक इलेक्ट्रिक कार आहेत. 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI