Komaki Ranger Electric Cruiser Bike: इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी कोमाकी या आठवड्यात बाजारात आपली रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वी रेंजर इलेक्ट्रिक बाईकची माहिती अधिकृतपणे देण्यात आली होती. दरम्यान, या बाईकमध्ये काही खास फीचर्सही आहेत शिवाय कोमाकीची ही रेंजर ई-क्रूझर देशात विक्रीसाठी जाणारी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर असेल.


यामध्ये चार kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो भारतातील इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये आढळणाऱ्या सर्वात मोठ्या बॅटरी पॅकपैकी एक असल्याचा दावा कंपनीने केली आहे. हा बॅटरी पॅक त्याच्या 5,000-वॅट मोटरला ऊर्जा देईल.


200 किमी रेंज
नवीन इलेक्ट्रिक बाईक एका चार्जमध्ये 200 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम आहे असा दावा कंपनीचा आहे. याशिवाय क्रूझ कंट्रोल फीचर, रिपेअर स्विच, रिझर्व्ह स्विच, ब्लूटूथ आणि अॅडव्हान्स ब्रेकिंग यांसारख्या सिस्टीम बाइकमध्ये पाहायला मिळतील.




किंमतही खास
या बाईकची किंमत आता काही दिवसांनी जाहीर केली जाणार आहे. या बॅटरीवर चालणाऱ्या क्रूझरची एकूण किंमत परवडणारी असेल असं कंपनीकडून आश्वासन देण्यात आलं आहे. जेणेकरून उत्पादन आणि मागणी वाढू शकेल असं कंपनीचं म्हणणं आहे. मोटारसायकलची किंमत 1 लाख ते 1.2 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. सध्या, कोमाकी इतर अनेक इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक देखील ऑफर करते, ज्यांची किंमत ₹30,000 ते ₹1 लाख, एक्स-शोरूम दरम्यान आहे.


इलेक्ट्रिक बाइकची मागणी वाढेल
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचे वर्चस्व आहे. इलेक्ट्रिक मोटरसायकलची संख्या खूप कमी आहे. तथापि, या इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकलमुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI