Upcoming Electric Cars: कोरियन कार निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर (Hyundai Motor) लवकरच आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कार कोनाचा फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करू शकते. एका रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या Ioniq 5 सह ही कार लॉन्च करू शकते. ही नवीन कोना फेसलिफ्ट इलेक्ट्रिक कार आधीच जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
फीचर्स अपडेट
कोना इलेक्ट्रिक फेसलिफ्टमध्ये मोठी 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. जी पूर्वी फक्त आठ इंचांवर उपलब्ध होती. याशिवाय यात सेफ्टी एग्झिट वॉर्निंग (Safety Exit Warning), मागील क्रॉस-ट्राफिक असिस्ट, व्हॉईस कंट्रोल, एकॉल, रिमोट चार्जिंग, क्लायमेट कंट्रोल, व्हॉईस कमांडसह ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी आणि इतर अनेक सेफ्टी फीचर्स मिळतील. पण डॅशबोर्ड आणि सेंटर कन्सोलची डिझाइन तशीच राहील.
बॅटरी
या नवीन कारमध्ये पूर्वीप्रमाणेच 39.2 kWh क्षमतेचा Li-ion बॅटरी पॅक मिळू शकतो. याची मोटर 136 hp ची असेल. तसेच यात 64 kWh बॅटरी पॅक देखील 204 hp मोटर व्हेरियंटसह येण्याची अपेक्षा आहे. या इलेक्ट्रिक कारची रेंज एका चार्जमध्ये सुमारे 500km असू शकते.
डिझाइन
यामध्ये बॉडी कलर्ससह व्हील आर्चसह पुन्हा डिझाइन केलेले अलॉय व्हील, नवीन फ्रंट ग्रील, नवीन डिझाइन केलेले स्लीक हेडलॅम्प, सुधारित पुढील आणि मागील बंपर, 10.25-इंच ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, लो क्लॅडिंग साइड प्रोफाइल सारखे बदल केले जाऊ शकतात. पाहिले इतर सर्व प्रोफाइल पूर्वीप्रमाणेच असू शकतात. Hyundai ने ही इलेक्ट्रिक कार भारतात 2019 मध्ये लॉन्च केली होती. तेव्हापासून ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. 2020 मध्ये कंपनीने या कारमध्ये काही बाह्य आणि अंतर्गत बदल केले आहेत. कंपनी लवकरच आपली दुसरी इलेक्ट्रिक कार Ioniq 5 देखील देशात लॉन्च करणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Best Mileage CNG Cars : 'या' CNG कारची किंमत कमी, परंतु मायलेजमध्ये खूप शक्ती, जाणून घ्या
- Electric Car : किंमत कमी आणि प्रवासही सुरक्षित; 'या' आहेत भारतातील 5 इलेक्ट्रिक कार
Car loan Information:
Calculate Car Loan EMI