Hyundai Tucson vs C5 Aircross Facelift : फ्रान्सची प्रसिद्ध वाहन उप्तादक कंपनी Citroen ने आपली नवीन SUV C5 Aircross Facelift लॉन्च केली आहे. गेल्या महिन्यात, Hyundai Motor ने भारतात आपली चौथी जनरेशन प्रीमियम SUV Tucson लॉन्च केली आहे. दोन्ही एसयूव्हीमध्ये एकापेक्षा एक आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही जर कार घेण्याचा विचार करत असाल तर यापैकी कोणती कार तुमच्यासाठी चांगली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


Hyundai Tucson vs C5 Aircross चा लूक कसा आहे? 


C5 एअरक्रॉस फेसलिफ्टला (C5 Aircross Facelift) स्पोर्टी डिझाईन देण्यात आले आहे. ज्यामध्ये नवीन स्लोप डिझाईन रूफ, मस्क्युलर बोनेट, नवीन डिझाईन केलेले फ्रंट ग्रिल आणि नवीन डिझाईन केलेले एलईडी हेडलाईट्स देण्यात आले आहेत. तर, ह्युंदाईचा लूक पाहिल्यास, Hyundai Tucson मध्ये क्रोम ग्रिल, मस्क्युलर हुड, रूफ रेल, ORVMs, रुंद एअर डॅम, स्लीक एलईडी हेडलाईट्स, एरो-कट डिझाईन, डेटाईम रनिंग लाईट्स (DRLs) सह 18-इंचाच्या अलॉय व्हीलचा वापर करून या कारला आकर्षक लूक देण्यात आला आहे. 


Hyundai Tucson vs C5 Aircross चे फिचरस् कसे असतील?


दोन्ही कार Hyundai Tucson आणि C5 Aircross या 5 सीटर एसयूव्ही (SUV) आहेत. या दोन्हीमध्ये 12.3 इंचाचा डिजिटल डिस्प्ले, एअर प्युरिफायर, पॅनोरामिक सनरूफ, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट कन्सोल, लेदर सीट्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसाठी सपोर्ट, रीअर व्ह्यू कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल, अॅम्बियंट लाइटिंग, इंजिन इमोबिलायझर, एअरबॅग्ज यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 


Hyundai Tucson ADAS टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. जी उत्तम सुरक्षिततात तर देतेच पण त्याचबरोबर तुम्हाला ड्रायव्हिंगचाही उत्तम असा आरामदायी अनुभव देते. मात्र, C5 Aircross मध्ये ADAS सुरक्षित प्रणाली देण्यात आलेली नाही.    


Hyundai Tucson vs C5 Aircross चे इंजिन कसे असेल? 


Citron C5 Aircross फेसलिफ्ट 2.0L डिझेल इंजिन आहे. ज्यामध्ये 177hp ची पॉवरफुल शक्ती आणि 400 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. Hyundai Tucson ला 2.0-L पेट्रोल इंजिन मिळते. जे जास्तीत जास्त 150hp आउटपुट आणि 192.2 Nm चे पीक टॉर्क निर्माण करते. तसेच, 2.0-लिटर डिझेल इंजिनचा ऑप्शनदेखील आहे.  


Hyundai Tucson vs C5 Aircross ची किंमत किती? 


Citroen ने त्यांच्या C5 Aircross फेसलिफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 36.67 लाख रुपये ठेवली आहे. तर, नवीन Hyundai Tucson ची किंमत 27.69 लाख रुपयांपासून सुरू होते.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI