Hyundai Creta च्या प्रचंड यशानंतर आता कंपनी भारतात आपली SUV रेंज वाढवण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई जागतिक बाजारात आकाराने मोठ्या असलेल्या SUV देखील बनवते. कंपनी भारतात आपली सर्वात मोठी एसयूव्ही असलेली 'टक्सन' लॉन्च करू शकते, अशी अपेक्षा केली जात आहे. या एसयूव्हीला 'पॅलिसेड' असे देखील म्हणतात. कंपनीचा हा मॉडेल 2023 मध्ये भारतात सादर होऊ शकतो. यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.


नवीन Palisade ही Hyundai ची सर्वात मोठी SUV आहे. ही 8-सीटर एसयूव्ही आहे. या मोठ्या एसयूव्हीमध्ये नवीन ग्रिल मिळू शकते. ही कार आकाराने मोठी असून जवळपास 5m लांब आणि खूप रुंद आहे.


फीचर्स 


कंपनी आपल्या या नवीन कारमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी 12 इंच टच स्क्रीन, हाय रिझोल्यूशनसह डिजिटल की आणि रिमोट कंट्रोल कीफॉब सारखे फीचर्स देऊ शकते. रिमोट कंट्रोल कीफॉबच्या मदतीने कार मागे-पुढे केली जाऊ शकते. याच्या आतील भागात तिसऱ्या रांगेत हीटिंग फंक्शन्स देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या रांगेमध्ये अनेक आरामदायी फीचर्स देण्यात आले आहे. या कारमध्ये ग्राहकांना भरपूर स्पेस मिळणार आहे. 


ही कार काही निवडक बाजारपेठांसाठी मोठ्या पेट्रोल V6 किंवा 2.2l डिझेलसह येते. अमेरिकन बाजारात या एसयूव्हीमध्ये नेव्हिगेशनशी जोडलेली ADAS फंक्शन्स देखील मिळते. ही लक्झरी कार खास अमेरिकन ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. जी आता लवकरच आपल्याला भारतीय बाजारपेठेत दिसू शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI