Hyundai Exter Safety Features : Hyundai ने अलीकडेच भारतात आपली सर्वात लहान आणि सर्वात कॉम्पॅक्ट SUV Hyundai Exter लॉन्च केली आहे. ही कार Grand i10 Nios वर आधारित आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख रूपये आहे. बाजारात या कारची मुख्य स्पर्धा टाटा पंचशी होणार आहे. ही कार ग्लोबल-NCAP ची 5-स्टार रेटेड आहे. अशा परिस्थितीत Hyundai Exter च्या सुरक्षिततेतही सुधारणा करणे आवश्यक आहे. खरंतर, कार खरेदी करण्यात ग्राहकांसाठी सुरक्षा हा एक मोठा घटक असतो. यासाठी कारची सुरक्षा रेटिंग फार महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे Hyundai ला खात्री आहे की EXter ही ग्लोबल NCAP आणि आगामी भारत NCAP मानकांनुसार भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून उदयास येईल.
Hyundai Exter कारची वैशिष्ट्य कोणती?
ह्युंदाई इंडियाचे सीओओ तरुण गर्ग यांच्या मते, 'एक्सेटरमध्ये सापडलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे ते ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचण्यांमध्ये चांगले रेटिंग मिळवू शकतील.' या कारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहा एअरबॅग्ज आहेत. तसेच, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर-व्ह्यू कॅमेरा, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, कीलेस एंट्री आणि सर्व सीटसाठी थ्री-पॉइंट सीटबेल्ट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (एचएसी), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखी अनेक फर्स्ट-इन-सेगमेंट सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारची बाह्य रचना देखील सुरक्षितता वाढविण्यात मदत करते.
अशा सुरक्षा वैशिष्ट्यांसह, जर तिला ग्लोबल-NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले, तर ती कंपनीची भारतातील पहिली 5-स्टार रेटेड कार असेल. क्रेटा आणि i20 सारख्या बेस्ट सेलर कारना देखील ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले नाही. या कारना फक्त 3-स्टार रेटिंग मिळाले.
मार्केटमध्ये टाटा पंचशी होणार स्पर्धा
पंच कारचा सामना करण्यासाठी, Hyundai Exter ने सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे होते. कारण सुरक्षितता रेटिंग हे कारच्या चांगल्या विक्रीमागे एक मोठे कारण आहे. जर एक्सेटरने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4-स्टार किंवा 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले, तर ही कंपनीसाठी सुरक्षित कारच्या नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI