Hyundai Creta N Line Booking Update : कार निर्माता कंपनी ह्युंदाईकडून (Hyundai Car) ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या व्हेरिएंटच्या कार सादर करण्यात येतात. नुकतीच कंपनीने घोषणा केल्यानुसार, Hyundai Creta N Line 11 मार्च 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. याआधीही, Hyundai कंपनीने आपल्या काही निवडक डीलरशिपनी आगामी Creta N Line साठी बुकिंग घ्यायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आपण कंपनीच्या या आगामी SUV बद्दल आणि बुकिंग रकमेबद्दल जाणून घेणार आहोत. 


क्रेटा एन लाईन बुकिंग सुरु 


एका डीलरशी बोलताना त्यांनी सांगितले की, ह्युंदाई कंपनीने आगामी क्रेटा एन लाईनसाठी बुकिंग घ्यायला सुरुवात केली आहे जी लवकरच लॉन्च होणार आहे. क्रेटा एन लाईन 25,000 रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केली जाऊ शकते. तुमचा विचार बदलल्यास, तुम्ही बुकिंग रद्द करून ही रक्कम काढू शकता. ऑटोमेकरने वेब पोर्टलद्वारे एसयूव्हीसाठी अधिकृत बुकिंग घेणं देखील सुरू केलं आहे. 


डिझाईन अपडेट


Hyundai Creta N Line ब्रँडच्या N Line-विशिष्ट सिग्नेचर थंडर ब्लू पेंट स्कीमसह ब्लॅक रूफसह येईल. Hyundai Venue N Line आणि i20 N Line प्रमाणेच, थंडर ब्लू पेंट स्कीममध्ये विविध भागांवर रेड कलर एक्सेंट मिळेल. हे पुन्हा डिझाईन केलेल्या पुढील आणि मागील बंपरसह स्पोर्टी आणि अधिक आक्रमक स्टाइलिंग मिळेल. एसयूव्ही वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये आणि दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. SUV चा एक प्रकार N10 असेल.


इंटर्नल भाग कसा असेल? 


Hyundai Creta N Line चा एक्सटर्नल लूक जसा आकर्षक आहे. तसाच, त्याचा इंटर्नल लूक देखील तितकाच खास आणि आकर्षक आहे. नव्याने लॉन्च होणाऱ्या Hyundai Creta N Line देखील त्याच्या केबिनमध्ये विशिष्ट फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये विविध ठिकाणी लाल स्टिचिंग आणि इन्सर्टसह स्पोर्टी ऑल-ब्लॅक थीम असेल. SUV मध्ये ड्युअल डिस्प्ले सेटअप, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री सराउंड कॅमेरा, वायरलेस चार्जर आणि ॲम्बियंट लाइटिंग या वैशिष्ट्यांसह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. यात 6 एअरबॅगसह ADAS सूट देखील मिळेल. तरी, जे ग्राहक ह्युंदाई कार विकत घेण्याचा विचार करत असाल त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करावी असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. 


महत्त्वाच्या बातम्या :


Tata Motors : Tata Curve आणि Nexon EV चे डार्क एडिशन लवकरच बाजारात येणार; जाणून घ्या काय असेल खास


Car loan Information:

Calculate Car Loan EMI