Honda Elevate Features: होंडा एलिवेटच्या (Honda Elevate) लाँचिंगसाठी अवघे काही दिवस उरले आहेत, पण त्याच्या नवीन स्पाय फोटोंवरून या एसयूव्हीमध्ये (SUV) मिळणाऱ्या फिचर्सचा अंदाज सहजपणे येऊ शकतो. ही कार 4 मीटर प्लस एसयूव्ही (SUV) असेल, जी होंडाची पहिली कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) असू शकते. होंडा एलिवेटचे (Honda Elevate) स्पाय फोटो त्यात देण्यात येत असलेल्या अपेक्षित फिचर्सचे संकेत देण्यासाठी पुरेसे आहेत.


स्लिम हेडलाइट्स आणि संभाव्य दोन-भागातील ग्रिलसह बॉक्सी डिझाइनमध्ये कार लाँच केली जाऊ शकते. होंडा एलिवेटमध्ये (Honda Elevate) 360 डिग्री कॅमेरा देखील असेल, जो नव्या फिचर्सच्या यादीत सर्वात टॉपला ठेवला जाऊ शकतो. तसेच, हा कॅमेरा लेन (Camera Lens) वॉच फीचरसोबत जोडला जाऊ शकतो, जो कंपनीने आपल्या होंडा सिटीमध्ये आधीच सादर केला आहे.


360 डिग्री व्ह्यू फीचरने सुसज्ज असेल गाडी


होंडा एलिव्हेटमध्ये रियर व्ह्यू कॅमेरा देखील उपलब्ध असेल, ज्यामुळे ड्रायव्हरला वेगवेगळ्या दिशेतील दृश्यं पाहता येतील आणि जेणेकरून गाडी सहज पार्क करता येईल. याशिवाय मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर प्रमाणे यात 360-डिग्री कॅमेरा देखील आहे. तसेच, होंडा सिटी प्रमाणेच, यामध्ये ADAS फंक्शन उपस्थित असेल, ज्यामध्ये अनेक फिचर्स देखील उपलब्ध असतील, जे या कारला आणखी सुरक्षित करण्यासाठी काम करतील.


360-डिग्री कॅमेराचे स्पष्ट आणि मोठे दृश्य पाहण्यासाठी टचस्क्रीनचा वापर केला जाईल, जे या होंडा एसयूव्हीमधील (SUV) एक नवीन फिचर असेल.


होंडा एलिव्हेट इंजिन


ही कार सुरुवातीला फक्त 1.5L पेट्रोल इंजिनसह ऑफर केली जाईल, जी नंतर हायब्रिड पर्यायासह देखील दिली जाऊ शकते. ट्रान्समिशनसाठी, ती 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक CVT पर्याय आणि पॅडल शिफ्टर्सशी जोडली जाईल.


Honda Motors ने अलीकडेच भारतात आपली नवीन 2023 City sedan लॉन्च केली आहे. ज्यामध्ये Advanced Driver-Assistant System (ADAS) सेफ्टी फीचर देण्यात आले आहेत. महिंद्रा XUV700 आणि MG Astor सारख्या कार देखील ADAS तंत्रज्ञानासह भारतीय बाजारपेठेत उपस्थित आहेत. ADAS प्रणाली देशात अजूनही नवीन आणि महाग आहे. ज्यामुळे बहुतेक ऑटोमेकर्स त्यांच्या कारचे टॉप-स्पेक प्रकार ADAS तंत्रज्ञानासह देतात. तर Honda City sedan चे बहुतांश प्रकार ADAS ला मानक म्हणून देतात. ही कार Hyundai Creta, Maruti Suzuki XL6, आगामी Hyundai Verna सारख्या कारशी स्पर्धा करते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI