BYD Atto 3 Launch : इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा सध्या भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात वाढतेय. नुकतीच चीनच्या इलेक्ट्रिक वाहन (Electric Car) उत्पादक कंपनी BYD ने काल (सोमवारी) आपली नवीन इलेक्ट्रिक SUV BYD Atto 3 कार भारतात लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक कारचे बुकिंग देखील सुरू झाले आहे. किमान 50,000 रूपये टोकन रक्कम भरून ग्राहक ही कार बुक करू शकतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 34 लाख रुपये आहे. आतापर्यंत 1,500 हून अधिक लोकांनी या कारचे बुकिंग केले आहे. जानेवारीपासून ग्राहकांना ही कार मिळण्यास सुरुवात होईल. भारतीय बाजारपेठेत ही कार Hyundai KONA आणि MG ZS EV शी स्पर्धा करणार असे सांगण्यात येत आहे. 


या कारची रेंज किती असेल? 


BYD Atto 3 मध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 201 bph ची पॉवर आणि 310 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 60.48kwh चा बॅटरी पॅक उपलब्ध आहे. जी एका चार्जमध्ये 521 KM ची रेंज देण्यास सक्षम आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या इलेक्ट्रिक कारमध्ये अत्यंत सुरक्षित अशा ब्लेड बॅटरी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ही कार फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100km/H चा वेग गाठू शकते. ही कार फक्त 50 मिनिटांत फास्ट चार्जरने 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. सा कंपनीचा दावा आहे. 


या कारचे फिचर्स : 


या इलेक्ट्रिक कारमधील फिचर्समध्ये 12.8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 6-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 4-वे अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, वायरलेस चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट यांचा समावेश आहे. फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, 5-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि लेव्हल 2 ADAS सिस्टम उपलब्ध आहेत. ही कार MG च्या ZS EV शी स्पर्धा करते, चला जाणून घेऊया या MG कारची खासियत काय आहे.


MG ZS EV सारख्या कारशी होणार स्पर्धा 


एमजीच्या या इलेक्ट्रिक कारची मोटर 176 पीएस पॉवर निर्माण करते. जे 50.3kWh बॅटरी पॅकशी जोडलेले आहे. ही कार 461 किमीची रेंज देते. ZS EV मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सात-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ आणि पॉवर ड्रायव्हर सीट, 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक, मागील AC व्हेंट्स आणि एक वायरलेस फोन चार्जर देखील मिळतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 22.58 लाख रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Upcoming SUVs: 'या' पॉवरफूल SUV आणि MPV कार लवकरच भारतात येत आहेत, तुम्हाला कोणती आवडेल?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI