Hyundai : जर तुम्हाला Hyundai ची Creta कार विकत घ्यायचीय, पण समजत नाही की EV घेऊ की ICE, तर थोडं थांबा आणि ही बातमी वाचा. जसं की आता सर्वांनाच माहित आहे की, Hyundai भारतात Creta EV चं उत्पादन करत आहे, जी भारतात लाँच झालेल्या फेसलिफ्टेड Creta वर आधारित आहे.
ICE प्रकारापेक्षा वेगळा EV Touch
Hyundai चा EV व्हेरिएंट म्हणजेच याचा EV Touch हा Creta च्या ICE प्रकारापेक्षा वेगळा असेल. तसेच यात प्रामुख्याने सध्याच्या फेसलिफ्टेड क्रेटाचा लूक असेल. EV व्हेरियंटमध्ये एरो ऑप्टिमाइझ्ड फ्रंट बंपर डिझाइन, ब्लँक ऑफ ग्रिल आणि विविध लाइटिंग सिग्नेचर असतील. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे यात 17-इंच आकाराची चाकं देखील मिळतील, जे विशेष EV टायर्ससह एरो ऑप्टिमाइझ केले जातील, ज्यामुळे या कारचा दर्जा वाढविण्यात मदत होणार आहे. तसेच त्याचे साइड प्रोफाइल Creta सारखेच राहील. परंतु ईव्ही बॅजसह त्याच्या मागील बाजूस काही बदल नक्कीच केले जाऊ शकतात.
Creta EV मध्ये काही खास बदल माहित आहेत?
या कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात EV शी संबंधित काही खास बदलही पाहायला मिळतात. ज्यामध्ये EV च्या माहितीसह इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा देखील समावेश केला जाऊ शकतो. याच्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे Creta EV ला 45kWh बॅटरी पॅक मिळेल, ज्याची रेंज सुमारे 450-500 किमी असू शकते. आणखी एक वैशिष्ट्य ज्याची अपेक्षा केली जाऊ शकते ते म्हणजे या कारमधील रिजेनरेटिव ब्रेकिंग असेल. जे स्टीयरिंग पॅडल्सद्वारे नियंत्रित केले जाईल, त्यासोबत पॅनोरॅमिक सनरूफ, कूल्ड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल यांसारख्या सर्व प्रीमियम फीचर्स असतील, जी या कारला एकदम खास बनवते.
चार्जर पर्यायांसह दोन बॅटरी पॅक
याला तुम्ही Creta EV किंवा इलेक्ट्रिक असं काहीही म्हणून शकता, Hyundai दोन चार्जर पर्यायांसह दोन बॅटरी पॅक देखील देऊ शकते. ऑटो मोबाईल्सच्या तज्ज्ञांच्या मते, Creta EV ची स्पर्धा Tata Curve EV आणि मारुती सुझुकी EVX शी होईल. Creta EV ची विक्री त्याच Hyundai डीलरशिप नेटवर्कद्वारे केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. Creta N-Line लाँच केल्यानंतर Creta EV देखील लाँच करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा>>>
Hyundai Casper EV चाचणी दरम्यान रिव्हील; कारची वैशिष्ट्य आणि लूक एकदा पाहाच
Car loan Information:
Calculate Car Loan EMI