Zeeta E-Bike : आपल्या वाहनांसाठी प्रसिद्ध असलेली टाटा मोटोर्सरच्या स्ट्रायडर ब्रँडने एक नवीन इलेक्ट्रिक सायकल भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या या सायकलचे नाव Zeeta असं ठेवलं आहे. कंपनीने ही सायकल कॉलेज आणि शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून बनवली आहे. कंपनीने या सायकलमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. ही इलेक्ट्रिक सायकल दिसायला खूपच स्मार्ट आहे. स्ट्रायडरच्या www.stryderbikes.com या वेबसाइटवर फॉरेस्ट ग्रीन आणि मॅट ग्रे या दोन रंगांमध्ये ही सायकल उपलब्ध आहे. या सायकलची किंमत 31,999 रूपये इतकी आहे. मात्र कंपनी नवीन लॉन्च ऑफरमध्ये ही सायकल ग्राहकांना  25,599 रुपयांमध्ये ऑफर करत आहे. कशी आहे ही इलेक्ट्रिक सायकल, यामध्ये ग्राहकांना किती रेंज मिळणार, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ...  


चार रुपयात धावणार 40 किमी 


स्ट्रायडरची ही नवीन सायकल मजबूत 36 V 250 W BLDC रिअर हब मोटरने सुसज्ज आहे. जी खडतर रस्त्यांवरही आरामदायी राइड ऑफर करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही ई-सायकल आतली फ्रेम लिथियम-आयन बॅटरी आणि कंट्रोलरसह येते. जी केवळ 3 तासांत पूर्ण चार्ज होते. ही एका चार्जवर 40km पर्यंत (हायब्रीड राइड मोड) रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. यात स्मार्ट ऑटो कट ब्रेकसह सेफ्टी फीचर्स मिळते. ज्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. Zeeta 27.5 एक उत्कृष्ट राइडिंग अनुभव देते आणि याच्या प्रति किमीसाठी फक्त 10 पैसे खर्च येतो. 


E-Bike Go इलेक्ट्रिक सायकल


इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी eBikeGo ने आपली नवीन इलेक्ट्रिक सायकल जानेवारीत लॉन्च केली होती. ट्रान्सिल ई1  (Transil e1) असे या सायकलचे नाव आहे. या सायकलसह कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. कमी अंतरासाठी या ई-सायकलचा खूप उपयोग होऊ शकतो. यात सिंगल-स्पीड ट्रान्समिशनसह युनिसेक्स स्टील फ्रेम आणि BMS सह लिथियम-आयन बॅटरी देण्यात अली आहे. eBikeGo च्या म्हणण्यानुसार, या ई-सायकलचा मेंटेनन्स  खर्च खूपच कमी आहे आणि 40 किमी पेक्षा कमी प्रवासासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. ही इलेक्ट्रिक सायकल 5 पैशांमध्ये एक किमी धावू शकते. स्पीड लिमिट फंक्शनसह वॉटर-रेजिस्टेंट डिझाइन देखील मिळते. ट्रान्सिल e1 ई-सायकल BLDC हब मोटर, 250 वॅट बॅटरी BMS लिथियम-आयन बॅटरी, 36V-5.2AH बॅटरी आणि चांगल्या सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI