eBikeGo launches Transil e1 bicycle: इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी eBikeGo ने नवीन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. ट्रान्सिल ई1  (Transil e1) असे या सायकलचे नाव आहे. या सायकलसह कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. ट्रान्सिल eBikeGo ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जातील, असे कंपनीचे म्हणणे आहे. Transil E1 सायकलसाठी प्री-बुकिंग काही आठवड्यांत सुरु होणार आहे. ही सायकल 3 रंगांमध्ये लॉन्च केली जाईल. ज्याची किंमत सुमारे 44,999 रुपये असेल. 


कमी अंतरासाठी या ई-सायकलचा खूप उपयोग होऊ शकतो. यात सिंगल-स्पीड ट्रान्समिशनसह युनिसेक्स स्टील फ्रेम आणि BMS सह लिथियम-आयन बॅटरी देण्यात अली आहे. eBikeGo च्या म्हणण्यानुसार, या ई-सायकलचा मेंटेनन्स  खर्च खूपच कमी आहे आणि 40 किमी पेक्षा कमी प्रवासासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. ही इलेक्ट्रिक सायकल 5 पैशांमध्ये एक किमी धावू शकते. स्पीड लिमिट फंक्शनसह वॉटर-रेजिस्टेंट डिझाइन देखील मिळते. ट्रान्सिल e1 ई-सायकल BLDC हब मोटर, 250 वॅट बॅटरी BMS लिथियम-आयन बॅटरी, 36V-5.2AH बॅटरी आणि चांगल्या सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज आहे.


ई-सायकल एका चार्जरने चार्ज केली जाऊ शकते ज्यात ऑटो कट-ऑफ फंक्शन आहे. यात पोर्टेबल बॅटरी-डेस्क चार्जिंग आणि ऑनबोर्ड चार्जिंग सारखे फीचर्स आहेत. याला कॉम्पॅक्ट एलईडी स्मार्ट डिस्प्लेसह यूजर इंटरफेस मिळतो. पूर्ण चार्ज केल्यावर ही सायकल 20-40 किमी चालवता येईल, असा कंपनीचा दावा आहे. याला पूर्ण चार्ज होण्यासाठी 2 ते 2.5 तासांचा वेळ लागतो. सायकलचा पॉवर मोड पेडल-असिस्टेड आहे आणि सायकलला स्वतंत्र क्रूझ मोड, वॉक मोड आणि थ्रॉटल मोड मिळतो, जो पर्यायी आहे. ई-बाईक 27.5-इंच चाकांवर धावते. तसेच पुढे आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.


Most Expensive Cycle in India: 105 किमीची देणार रेंज


यात 250W इलेक्ट्रिक मोटर पेडल आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही ई-सायकल पूर्ण चार्ज केल्यावर 105 किमी पर्यंतची रेंज देते. दोन्ही मॉडेल्समध्ये पुढील आणि मागील बाजूस रॉकशॉक्स सस्पेन्शन आहे, जे आरामदायी राईडसाठी महत्वाचं काम करतात.


X-फॅक्टर सीरीज तीन सेगमेंटमध्ये विभागली गेली आहे. यात X1, X2 आणि X3 चा समावेश आहे. अल्ट्रा-प्रिमियम रेंजच्या तुलनेत, X-फॅक्टर मॉडेल्समध्ये MTB फ्रेमवर आधारित X1 आणि X3 सह स्टील बांधकाम वैशिष्ट्यीकृत आहे. तर X2 मध्ये युनिसेक्स फ्रेम आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI