EaS-E Electric Car: मुंबईतील वाहन स्टार्ट-अप कंपनी PMV लवकरच भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. EaS-E असं या इलेक्ट्रिक कारचे नाव असणार आहे. ही इलेक्ट्रिक कार EaS-E जुलै महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. EaS-E चा लूक Citroen AMI आणि MG E200 शी मिळताजुळता असू शकतो. या कारमध्ये ग्राहकांना 13-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत. स्मार्ट मायक्रो इलेक्ट्रिक कार EaS-E कंपनीने दररोज प्रवास करता येईल, अशा पद्धतीने डिझाइन केली आहे. ही कार 4 लाख ते 6 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या रेंजमध्ये पाहायला मिळेल. EaS-E ही 2 सीटर इलेक्ट्रिक कार आहे.


फीचर्स 


EaS-E कारमध्ये ग्राहकांना रिमोट की कनेक्टिव्हिटी, रिमोट पार्किंग असिस्ट सिस्टम, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यासारखे फीचर्स मिळतील. इतर फीचर्समध्ये air conditioner, बॅक कॅमेरा, स्टीयरिंग माउंट कंट्रोल, OTA अपडेट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॉवर विंडो, इलेक्ट्रॉनिक नियंत्रित मिरर यांचा समावेश आहे. साइड लूकबद्दल बोलायचे झाले तर, यात एक मोठा ग्लास आणि मल्टी-स्पोक अलॉय देखील समाविष्ट करण्यात आला आहे. PMV EaS-E कारला 10 kWh लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरीसह 15 kW (20 bhp) PMSM इलेक्ट्रिक मोटर मिळेल. या कारची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. या 2-सीटर इलेक्ट्रिक कारमध्ये मागील बाजूस LED टेललॅम्प देखील देण्यात आले आहेत. यात 170 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळेल. ही कार ब्राऊन, यलो, ब्लू, ब्लॅक, ऑरेंज, रेड, ग्रीन, व्हाईट आणि सिल्व्हर अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.


बुकिंग सुरू 


स्टार्टअप कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिकनुसार, ही कार 4 तासांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकते. कंपनीने असाही दावा केला आहे की, याची बॅटरी सेल लाइफ 5-8 वर्षांपर्यंत असेल. ग्राहक ही कार कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन बुकिंग करू शकतात. कंपनी डायरेक्ट-टू-कंझ्युमर मॉडेल सिस्टम अंतर्गत ही कार विकणार आहे. पहिल्या वर्षी या कारचे सुमारे 15000 युनिट्स विकले जातील, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI