Ducati Scrambler Urban Motard: इटालियन दुचाकी उत्पादक Ducati ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन Ducati Scrambler Urban Motard लॉन्च केली आहे. नवीन Scrambler Urban Motard ची किंमत कंपनीने 11.49 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी ठेवली आहे. Ducati Scrambler Urban Motard Scrambler 800 सिरीजवर आधारित आहे. यात कंपनीने दमदार इंजिनसह अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. चला तर या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... 


स्पेसिफिकेशन 


या बाईकमध्ये 50mm थ्रॉटल बॉडीसह इंधन-इंजेक्‍ट 803cc L-ट्विन इंजिनमधून पॉवर मिळते. जे 8,250rpm वर 71.8bhp आणि 5,750rpm वर 66.2Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन स्ट्रेट कट गियरसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Ducati Scrambler Urban Motard ला हायड्रॉलिकली नियंत्रित स्लिपर आणि सेल्फ-सर्वो वेट मल्टी-प्लेट क्लच मिळतात. स्क्रॅम्बलर अर्बन मोटार्डमध्ये एक ट्यूबलर स्टील ट्रेलीस फ्रेम आहे, ज्याला पुढील बाजूस कायाबा 41 मिमी अपसाइड डाउन फोर्क आणि मागील बाजूस प्री-लोड मोनोशॉक देण्यात आले आहे. या बाईकमध्ये Pirelli Diablo Rosso III टायर्स - 120/70-ZR17 (फ्रंट) आणि 180/55-ZR17 (मागील) सह 17-इंच स्पोक अॅल्युमिनियम चाके वापरण्यात आली आहेत.


यामध्ये समोरील बाजूस 330mm डिस्क ब्रेक मिळतो, जो रेडियल 4-पिस्टन कॅलिपरने बाईकला पूर्णपणे थांबवण्यासाठी क्लॅम्प केलेला असतो. मागील बाजूस, Scrambler Urban Motard ला सिंगल पिस्टन फ्लोटिंग कॅलिपरसह 245mm डिस्क ब्रेक मिळतो.


फीचर्स 


डुकाटी स्क्रॅम्बलर अर्बन मोटार्डमध्ये काही खास फीचर्स आहेत, जी या बाईकला इतर बाईकच्या तुलनेत खूप वेगळं करते. Scrambler Urban Motard मध्ये एलईडी डीआरएल आणि बदल करण्यायोग्य अॅल्युमिनियम फ्रेमसह एलईडी हेडलाइट वापरण्यात आले आहे. या बाईकमध्ये एलईडी टर्न इंडिकेटर आणि फुल डिफ्यूजन एलईडी टेललाइट लावण्यात आले आहेत. बाईकला गीअर आणि फ्युएल लेव्हल इंडिकेटरसह एलसीडी इन्स्ट्रुमेंटेशन देण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI