CNG Car under 7 Lakh rupees : सामान्यत: ग्राहक कार विकत घेताना आपल्या सुरक्षेचा विचार तर करतातच, पण, कमी पैशांत जास्तीत जास्त सेफ्टी फीचर्स आणि जास्त मायलेज (Mileage) ग्राहकांना हवे असतात. अशातच सीएनजी कारलाही लोकांची मागणी आहे. भारतीय ऑटोमोबाईल (Automobile) मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत, ज्या लोकांना 7 लाख रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात. 7 लाख रुपयांपर्यंतच्या या रेंजमध्ये मोठ्या ब्रँडच्या वाहनांच्या नावांचा समावेश आहे. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सकडून उत्तम मायलेज असलेल्या 7 लाख रुपयांच्या रेंजमधील चांगल्या सीएनजी कार बाजारात उपलब्ध आहेत. या कारची संपूर्ण यादी जाणून घेऊयात. 


मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)


मारुती सुझुकी वॅगनआर 7 (Maruti Suzuki WagonR) ही कार लाखांपर्यंतच्या रेंजमधील खरेदीदारांसाठी एक चांगली निवड असू शकते. ही कार 1 किलो CNG सह 34.05 किलोमीटरचा मायलेज देते. WagonR च्या LXI CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख रुपये आहे आणि VXI CNG व्हेरियंटची किंमत 6.89 लाख रुपये आहे.


मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso)


Maruti Suzuki S-Presso च्या LXI CNG व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे. तर त्याच्या VXI CNG व्हेरिएंटची किंमत 6.12 लाख रुपये आहे. ही कार 1 किलो CNG सह 32.73 किलोमीटरचा मायलेज देते.


टाटा टियागो (Tata Tiago)


Tata Motors ची Tata Tiago देखील उत्तम मायलेजसह 7 लाख रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. Tata Tiago XI CNG ची एक्स-शोरूम किंमत 6.60 लाख रुपये आहे. ही कार 26.49 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देते.


मारुती सुझुकी Eeco (Maruti Suzuki Eeco)


मध्यम रेंजमधील ग्राहकांना मारुती सुझुकीचे इको मॉडेल खरेदी करायलाही आवडते. Maruti Suzuki Eeco चे CNG मायलेज 26.78 किमी प्रति किलो आहे. या कारच्या 5-सीटर एसी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.58 लाख रुपये आहे. 


मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10)


Maruti Suzuki Alto K10 च्या LXI S-CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.74 लाख रुपये आहे आणि VXI S-CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे. ही कार 1 किलो CNG वर 33.85 किलोमीटर मायलेज देते. तुम्हीसुद्धा कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी चांगले ऑप्शन्स ठरू शकतात. 


महत्त्वाच्या बातम्या :


Tata Motors : Tata Curve आणि Nexon EV चे डार्क एडिशन लवकरच बाजारात येणार; जाणून घ्या काय असेल खास


Car loan Information:

Calculate Car Loan EMI